Voice of Eastern
ताज्या बातम्या मोठी बातमी शहर

सावित्री नदीतील गाळ काढण्यासाठी प्रस्ताव सादर करा – आदित्य ठाकरे

banner

मुंबई :

रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीतील गाळ काढण्यासाठी सीआरझेडची परवानगी आवश्यक आहे. यासाठी बाणकोट खाडी परिसरातील नौकानयन सुलभ होण्याच्या अनुषंगाने जलसंपदा विभागाने महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडे सुधारित प्रस्ताव सादर करावाअसे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.

सावित्री नदीच्या मान्सूनपूर्व तयारीचा ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. यावेळी पर्यटन राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरेखासदार सुनील तटकरेस्थानिक आमदार भरत गोगावलेपर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकरजलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी श्री. गौतमपूर नियंत्रण समिती रायगडचे सदस्य आदी उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.  

महाडजवळ बाणकोट खाडीत नौकानयन सुलभ होण्यासाठी मेरीटाईम बोर्ड आणि राजेवाडी ते केंबुर्ली या भागात सावित्री नदीतील गाळ आणि बेटे काढण्यासाठी जलसंपदा विभागाने स्वतंत्र प्रस्ताव सादर केले होते. यातील मेरीटाईम बोर्डाच्या प्रस्तावास महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीमार्फत मान्यता देण्यात आली आहे. जलसंपदा विभागाने सीआरझेडमधील तरतुदींनुसार मेरीटाईम बोर्डमार्फत सुधारित प्रस्ताव सादर केल्यास त्यास मान्यता देता येईलयाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

Related posts

इस्रायल येथील रस्त्याला शिवाजी महाराजांचे नाव देणार!

वेळेत उपचार न मिळाल्याने गरोदर महिलेचा मृत्यू, मुलुंड मधील घटना

Voice of Eastern

आयडॉलमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास मुंबई विद्यापीठ अनुत्सूक

Leave a Comment