Voice of Eastern

मुंबई :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत राज्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२  दरम्यान आयोजित  केली आहे. कोविड- १९ या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह शाळा उशिराने सुरु होणे तसेच शाळा बंद असताना शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवले होते. कोविड- १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या अनेक समस्यांमुळे विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा आत्मविश्वासाने देता यावी यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान विषयासंदर्भात ‘परीक्षेची यशस्वी तयारी’ या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे २३ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये इयत्ता दहावीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ व २ या विषयातील कठीण संकल्पनांची उजळणी, प्रश्न प्रकारानुसार आणि प्रश्नपेढीबाबत मार्गदर्शन, यशस्वी परीक्षेची तयारी (सर्वसाधारण सूचना, वेळेचे नियोजन, प्रश्नपत्रिका आराखडा) याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. https://www.maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi_10 या संकेतस्थळावर विषय व माध्यमनिहाय प्रश्नपेढी अपलोड करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे सहसंचालक रमाकांत काठमोरे यांनी दिली.

असे असणार कार्यक्रम

  • २३ फेब्रुवारी – दुपारी ३ ते ४:३० – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ : https://youtu.be/lwXeYdSY_LM
  • २४ फेब्रुवारी – दुपारी ३ ते ४:३० – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ : https://youtu.be/Rjd5N7PFilQ
  • २५ फेब्रुवारी – दुपारी ३ ते ४:३० – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २ – https://youtu.be/2DpF3qVxttM
  • २८ फेब्रुवारी – दुपारी ३ ते ४:३० – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २ : https://youtu.be/NvFMY0Ezemo
  • १ मार्च – दुपारी ३ ते ४:३० – परीक्षेची यशस्वी तयारी :https://youtu.be/0YtknXBrCKo

Related posts

पशु पक्ष्यांच्या उपचारासाठी ११ ऍम्ब्युलन्स

राज्य कबड्डी निवड स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्या मुंबई उपनगरचा पराभव

निवडणूक कामावर बहिष्कार टाकण्याचा शिक्षकांचा इशारा

Voice of Eastern

Leave a Comment