Voice of Eastern
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

मुंबईत नवजात बाळावर यशस्वी शस्त्रकिया करून जन्मजात व्यंगापासून केली सुटका

banner

मुंबई :

बाळ जन्माल आल्यानंतर प्रत्येक आईबापाला आनंद होतो. मात्र मुंबईतील एका घटनेत बाळ जन्माला आल्यानंतर अवघ्या २४ तासांतच त्याच्यावर अवघड अशी शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. त्यामुळे बाळ झाल्याचा आनंद काही काळातच त्यावर होणार्‍या शस्त्रक्रियेने हिरावून घेतला. मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने त्या मातापित्यांच्या चेहर्‍यावर काही तासांत पुन्हा तो आनंद उमटला. आईच्या पोटात असतानाच बाळाला डुओडेनल अ‍ॅट्रेसिया प्रकारचा आजार झाल्याचे लक्षात आले. फारच दुर्मिळ असलेल्या या आजारामध्ये बाळाच्या आतड्यांमध्ये अडथळा निर्माण होता. यामुळे बाळामध्ये कायमचे व्यंग निर्माण होण्याचा किंवा ते दगावण्याचा धोका अधिक असतो. मात्र बाळ जन्मल्यानंतर अवघ्या २४ तासांत त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी त्याला नवजीवदान दिले.

भायखळ्यातील शहनाज (३४) या गर्भवती महिलेला ३२ आठवड्यांच्या नियमित तपासणीदरम्यान बाळाच्या आतड्यांमध्ये अडथळा असल्याचे समजले. या आजाराला डुओडेनल एट्रेसिया असे म्हणतात. फारच दुर्मिळ असलेल्या या आजारात आतड्यांच्या सुरुवातीचा भाग तयार होत नाही. त्यामुळे तांत्रिक अडथळा येऊन दूध व पाचक द्रव्य पदार्थ पुढे जात नाहीत. या केसमध्ये या सर्व बाबींचा विचार करून गर्भवती मातेला पुढील दोन महिने हाजी अली येथील एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये योग्यरीत्या हाताळण्यात आले. बाळाची प्रसूती कार्यक्षमतेने हाताळण्यात आली. अशा प्रकरणांमध्ये अनेकवेळा बालकांमध्ये व्यंग निर्माण होण्याचा अथवा दगावण्याचा धोका असतो. त्यामुळे बाळ जन्माला आल्यानंतर तातडीने २४ तासामध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच्या ओटीपोटावर लॅप्रोस्कॉपीक तंत्रज्ञानाद्वारे शस्त्रकिया करण्यात आली. त्यानंतर पाच दिवसांनी मोठ्या आतड्यातून लहान आतड्यांमध्ये दुधाचा प्रवाह चांगल्या प्रकारे होत असल्याचे दिसून आले. बाळाची पचनसंस्था सुरळीत सुरु झाली होती. त्यानंतर बाळाला तोंडावाटे आहार देण्यास सुरुवात केली. ११ व्या दिवशी त्याला पूर्ण आहार सुरु करून घरी सोडण्यात आले, अशी माहिती एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पिटलचे बालरोग शस्त्रक्रिया जेष्ठ तज्ज्ञ डॉ. रसिक शहा यांनी दिली. या शल्यचिकित्सेसाठी डॉ. रसिक शहा यांच्याबरोबर बालरोग शस्त्रक्रिया वरिष्ठ सल्लागारा डॉ. रवी रामद्वार, पेडियाट्रिक ऍनेस्थेसिया प्रमुख व सल्लागार डॉ. नंदिनी दवे, बालरोग तज्ज्ञ डॉ. विनित समदानी या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पिटल हे मुंबईतील अत्याधुनिक तंत्रज्ञानानी सुसज्ज असून नवजात बालकांसाठी आधुनिक उपचार उपलब्ध आहेत. या हॉस्पिटलमध्ये छोट्या बालकानावर व नवजात बालकांवर अत्यंत दुर्मिळ यशस्वी शल्यचिकित्सा होत असतात.

Related posts

ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

“जय जय महाराष्ट्र माझा” गीताला महाराष्ट्र राज्यगीताचा दर्जा

अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान एव्हरेस्टसाठी एकत्र

Voice of Eastern

Leave a Comment