Voice of Eastern
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

दोन महिन्याच्या बाळाच्या हृदयावर जे जे रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

banner

मुंबई :

दोन महिन्याच्या बाळाच्या  ह्रदयाला असलेल्या छिद्रावर यशस्वी शस्रक्रिया करुन या लहानग्याला जीवनदान देणाऱ्या जे. जे. रुग्णालयाच्या कॉर्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. कल्याण मुंडे यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. 

कर्नाटकच्या गुलबर्गा येथील रहिवासी आणि मुंबईत रोजगारासाठी आलेल्या राहुल राठोड यांच्या दोन महिन्याच्या लहान मुलाला श्वास घेण्यास त्रास आणि पुरेशी झोप येत नसल्याचे निदर्शनास आलेत्यानंतर त्यांनी गुलबर्गा येथील रुग्णालयात या बाळाच्या चाचण्या केल्या त्यावेळी या बाळाच्या हृदयाला ६ मि.मि. आकाराचे छिद्र असल्याचे निदर्शनास आले. काही डॉक्टरांशी संपर्क केल्यानंतर हृदयाचा आकार लहान असल्यामुळे शस्त्रक्रिया करण्यास अडचण असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर राठोड यांनी जे. जे. रुग्णालयात जाऊन डॉ. मुंडे यांच्याशी संपर्क साधला. खुली शस्त्रक्रिया न करता त्यांनी ट्रान्सकॅथेटर प्रक्रियेद्वारे ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होत असून बाळाचा आहार आणि झोप व्यवस्थित होत असल्याचे दिसून आले आहे.

डॉ. कल्याण मुंडे यांनी अवघड शस्त्रकिया यशस्वी करुन बाळाला नवजीवन दिल्याबद्दल मंत्रालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी डॉ. मुंडे यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजयवैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंहसंचालक डॉ. दिलीप म्हैसेकरसहसंचालक डॉ. अजय चंदनवालेउपसचिव प्रकाश सुरवसे आदी उपस्थित होते.

Related posts

मध्य रेल्वेवर शनिवार ते सोमवार मेगाब्लॉक; १७५ लोकल, ४३ मेल एक्स्प्रेस होणार रद्द

Voice of Eastern

महाराष्ट्रात डेंग्यू, हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ

Voice of Eastern

दिव्यांग गौरव आंबवणे चमकला

Voice of Eastern

Leave a Comment