Voice of Eastern

नवी दिल्ली :

अतिरिक्त स्वदेशी सामग्री आणि सुधारित कार्यक्षमता असलेल्या ब्रह्मोस या सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राची २० जानेवारीला सकाळी १०.३० वाजता यशस्वी चाचणी घेण्यात आली. एरोस्पेसने संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने ओदिशाच्या किनारपट्टीजवळ चंडीपुर येथील एकात्मिक चाचणी केंद्रात ही चाचणी केली.

 


ब्रह्मोस क्षेपणास्त्राने आपल्या सर्व उद्दिष्टे साध्य करताना अतिजलद वेगाने त्याच्या संपूर्ण क्षमतेसह लक्ष्याच्या दिशेने झेपावले. संपूर्ण स्वदेशी बनावटीचे हे क्षेपणास्त्रामध्ये सुसज्ज तंत्रज्ञांनाचा वापर करून त्याची कार्यक्षमतेत वाढ करण्यात आली आहे. क्षेपणास्त्रामध्ये अतिरिक्त क्षमता निर्माण करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या प्रक्षेपण चाचणीवर पूर्व किनारपट्टीजवळील समुद्रामध्ये तैनात जहाजांवर असलेल्या टेलीमेट्री, रडार आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग प्रणालीसह रेंज इन्स्ट्रुमेंटेशनच्या सर्व सेन्सर्सद्वारे देखरेख ठेवण्यात आली होती. समुद्र आणि जमिनीवरील लक्ष्यांविरोधात लक्ष्यचा अचूक वेध घेण्याची ब्रह्मोसची क्षमता असून, या क्षमतेत वाढ करण्यासाठी व ते अधिक शक्तीशाली बनवण्यासाठी त्यामध्ये सातत्याने सुधारणा करण्यात येत असतात. ही सुधारणा डीआरडीओ आणि रशियाच्या एनपीओएम हे संयुक्तरित्या करत असतात. ब्रह्मोसची चाचणी यशस्वी झाल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि उद्योग क्षेत्राचे अभिनंदन केले.

Related posts

इरशाळवाडी दुर्घटनेत १० जण मृत्युमुखी; बचाव कार्यात अडथळे – उपमुख्यमंत्री

परिचारिकांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा- अनिल गलगली

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच

Leave a Comment