Voice of Eastern

मुंबई : 

अभिनेत्री सनी लिओनी सध्या अनेक कारणांसाठी चर्चेत असताना ती आता एक नवा कोरा प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिच्या कामाच्या चर्चा सर्वत्र असताना ती एक अफलातून गाणं घेऊन येणार असल्याचं समजतं असताना एक नवीन बातमी समोर आली आहे. बॉलीवूडच्या रसिकांना एक रोमांचक आणि आनंददायक परफॉर्मन्स बघायला मिळणार असून जेव्हा या स्रोताने हे उघड केले की माधुरी दीक्षितने एकेकाळी सादर केलेला प्रसिद्ध डान्स नंबर पुन्हा तयार करण्यासाठी सनी लिओनी तयार झाली आहे.

आता हे गुपित उघड झाले आहे की माधुरी आणि सनी या दोघांच्याही चाहत्यांसाठी हा नॉस्टॅल्जिया ठरणार आहे.” मेरा पिया घर आया 2.0″ या प्रतिष्ठित गाण्यात तिच्या अप्रतिम नृत्य सादरीकरणाने सनी तिच्या चाहत्यांना मोहित करणार आहे. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक विजय गांगुली यांनी हा डान्स कोरिओग्राफ केला आहे. या रिमेकच्या चर्चा सगळीकडे होत असताना आता हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. खूप अपेक्षेनंतर आता गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे हे गाणे ८ ऑक्टोबर रोजी रिलीज होत आहे. हे गाणे दुसरे तिसरे कोणी नसून “मेरा पिया घर आया” आहे, जे मूळत: १९९५ च्या ब्लॉकबस्टर चित्रपट यारानामध्ये प्रदर्शित केले गेले होते. ज्याला बॉलीवूडच्या चाहत्यांनी खूप प्रेम दिलं.

Related posts

दंतवैद्यकांनी प्रोस्थोडोंटिक वॉकथॉनमधून ‘लेट स्माईल, गो माईल्स’चा दिला संदेश

Voice of Eastern

रुग्णसेवेप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडेही रुग्णालय भेटीत लक्ष द्या – कर्मचाऱ्यांचे डॉ. सुधाकर शिंदे यांना पत्र

खंडू रांगणेकर स्मृती क्रिकेट स्पर्धा : अलिना मुल्लाला विजेतेपद

Leave a Comment