Voice of Eastern
ताज्या बातम्यापूर्व उपनगरमोठी बातमीशिक्षण

शिक्षकांनी अनिल बोरनारे यांना शिक्षक आमदार म्हणून निवडून द्यावे – भाजपचे धनराज विसपुते यांचे शिक्षकांना आवाहन

banner

मुंबई :

केवळ मुंबईतीलच नव्हे तर राज्यातील शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी तळमळीने काम करणाऱ्या अनिल बोरनारे यांना मुंबईतील शिक्षकांनी शिक्षक आमदार म्हणून निवडून द्यावं असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे पदवीधर संयोजक धनराज विसपुते यांनी केले. दादरमधील छबिलदास शाळेच्या सभागृहात मुंबई मराठी अध्यापक संघ, जुनी पेन्शन शिक्षक संघर्ष समितीचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी आयोजित केलेल्या शिक्षक मेळाव्याला ते बोलत होते. यावेळी नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, महाराष्ट्र सुकाणू समितीचे सदस्य संतोष भणगे, महामुंबई शिक्षण संस्था संघटनेचे जनरल सेक्रेटरी सदानंद रावराणे, महामुंबई शिक्षण संस्था संघटनेचे सहसचिव विनय राऊत, बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस वीणा दोनवलकर, बृहन्मुंबई माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघाचे कोषाध्यक्ष नकुल लवू रेडकर हे उपस्थित होते

मुंबईतील २०० शाळांमधील शिक्षकांना आदर्श शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक व आदर्श शिक्षकेतर म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. २००५ च्या आधी व नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, विना अनुदानित शाळांना पुढील अनुदानाचा टप्पा जाहीर करावा, कॅशलेस मेडिक्लेम योजना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी, वरिष्ठ व निवडश्रेणी विनाअट देण्यात यावी, मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन मुंबईतच करावे यासह अनेक ठराव या मेळाव्यात मांडण्यात येऊन मंजूर करण्यात आले. या विषयावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांसोबत बैठक घेणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.

Related posts

लोकसहभागातून राबविणार अंगणवाडी दत्तक धोरण

मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत आहे कांचन वृक्ष!

महाराष्ट्र प्राध्यापक सेनेतर्फे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी

Voice of Eastern

Leave a Comment