Voice of Eastern

मुंबई :

राईट टू एज्युकेशन कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षकांना कोणत्याही प्रकारचे अशैक्षणिक कामे देऊ नये, असे असतांना निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांना मोठ्या प्रमाणात जुंपण्यात आले आहे. या कामामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या कामावर परिणाम होत आहे. त्यामुळे निवडणूक कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा शिक्षक नेते व भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल बोरनारे यांनी दिला आहे. यासंदर्भात निवडणूक अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना भेटून शिक्षकांना या कामातून वगळण्याची मागणी करणार असल्याचे बोरनारे यांनी सांगितले.

मराठा आरक्षण सर्वेक्षणासाठी शिक्षकांना कामाला लावल्यानंतर आता लगेचच निवडणुकीच्या कामाला शिक्षकांना जुंपण्यात आले आहे. निवडणूक कामासाठी रविववारी ठेवलेल्या प्रशिक्षणाची सूचना शनिवारी रात्री अचानक शिक्षणाधिकाऱ्यांकडून पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. तसेच यातील पत्ताही अर्धवट असल्याने शिक्षकांना सकाळी लवकर उठून पत्ता शोधत निवडणूक प्रशिक्षण केंद्र गाठावे लागले आहे. मुंबईतील निम्म्यापेक्षा जास्त शिक्षकांना निवडणूक ड्यूटी लावण्यात आली आहे. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना कोणी शिकवायचे, काही दिवसांमध्ये परीक्षांचा सुरू होत असल्याने परीक्षा कोणी घ्यायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. एका खासगी अनुदानित शाळेतील प्राथमिक वर्गामध्ये सात शिक्षक आहेत. त्यातील सहा शिक्षकांना निवडणुकीच्या कामावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे एका शिक्षकाने उर्वरित वर्ग कसे घ्यायचा असा प्रश्न शाळेच्या मुख्याध्यापकांसमोर निर्माण झाला आहे. देशाचे भवितव्य ठरविणाऱ्या निवडणुकीसाठी शिक्षकांना कामाला लावत देशाचे भवितव्य घडविणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र वाऱ्यावर सोडण्यात येत असल्याची प्रतिक्रिया शिक्षक व पालकांमध्ये उमटत आहेत.

यु डायस, मुख्यमंत्री सुंदर शाळा यासारखी असंख्य कामे शिक्षकांच्या माध्यमातून करण्यात येतात. विद्यार्थ्यांचे अध्ययन व अध्यापनाबरोबरच परीक्षांचे नियोजन व इतर रोजची ऑनलाईन कामे शिक्षकांना नियमित करावी लागतात. ही कामे करत निवडणुकीची कामे कशी करावी, असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे. निवडणूक कामामुळे विद्यार्थ्यांना अध्ययन व अध्यापनावर परिणाम होत असल्याने निवडणूक कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा शिक्षक नेते व भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल बोरनारे यांनी दिला आहे.

Related posts

नवीन शैक्षणिक धोरणासाठी मुंबई विद्यापीठाने अभ्यास गट स्थापना करा; युवासेना सिनेट सदस्यांची मागणी

शिल्पा शेट्टीच्या आगामी ‘सुखी’ चित्रपटातील ‘नशा’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष : १० महिन्यांमध्ये ८ हजारांहून अधिक रुग्णांना मदत

Leave a Comment