Voice of Eastern

मुंबई : 

आगामी दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना लसीकरण बंधनकारक नसल्याचे शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान अद्यापही लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये, अशा स्पष्ट सूचना शिक्षण उपसांचालकांकडून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव पालकांच्या संमतीनुसार लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही शिक्षण करण्यात येत आहे. राज्यामध्ये शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांनी दोन्ही डोस घेण्याची सक्ती होत आहे. त्या संदर्भातील अनेक तक्रारी राज्य मंडळ व शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालनालयाकडून या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

राज्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु असून आता सर्व शाळा व महाविद्यालये नियमित सुरु झाल्यानंतर शाळां/ महाविद्यालयांनी पुढाकार घेऊन विद्यर्थ्यांचे लसीकरण करून घ्यावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान आता दहावी बारावीच्या परीक्षा जवळ येत असून या विद्यर्थ्यांना लसीकरणात प्राधान्य देण्यात यावर सेही सूचित करण्यात आले आहे. मात्र असे करत असताना कोणत्याही विद्यार्थ्यांवर लसीकरण बंधनकारक करता येणार नय से स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी लसीकरणासाठी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करावे, कोणत्याही प्रकारची सक्ती करू नये, अशा सूचना संबंधित शाळा आणि महाविद्यालयांना देण्यात याव्यात असे निर्देश विभागीय उपसंचालकांना देण्यात आले आहेत.

सुरक्षिततेसाठी लसीकरण आवश्यक 

दहावी बारावी नियमित लेखी परीक्षणाच्या निमित्ताने पहिल्यांदाच विद्यार्थी मोठ्या संख्येने सामाजिक अंतर राखत, कोविड प्रतिबंधित नियमांची काळजी घेत एकत्रित येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लसीकरण झाल्यास सुरक्षिततेची हमी बाळगता येईल. मात्र म्हणून पालकांची समंती नसताना विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी लसीकरण बंधनकारक करता येणार नाही अशी माहिती विभागीय मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Related posts

राज्यातील युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे; गुरुपौर्णिमेपासून राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण कार्यक्रम सुरू होणार

सीईटी सेलकडून आठ अभ्यासक्रमांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ

क्षयरोगाची औषधे डिसेंबरपर्यंत मिळणे अवघड; क्षयराग समन्वयक, संस्थाचा आरोप

Leave a Comment