विक्रोळी :
विक्रोळी पुर्वद्रुतगती मार्गावरील जेव्हीएलार ब्रिजवर रात्री ११:३० च्या सुमारास ४ गाड्यांचा अपघात झाला. या अपघातात दोन बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना जवळील महात्मा फुले रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पूर्वद्रुतगती मार्गावर विक्रोळी येथे शनिवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास चार गाड्या एकमेकांना मागून धडकल्या. या भीषण अपघातामध्ये दोन बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींवर विक्रोळीतील महात्मा फुले रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले. अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी विक्रोळी पोलीस ठाणे व वाहतूक पोलीस पोहचून अपघात झालेल्या गाड्या क्रेनच्या मदतीने बाजूला करून वाहतुकीचा मार्ग मोकळा केला.