नवी दिल्ली :
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने सुरत विभागातील चलथान ते खरगपूर विभागातील संक्रेलदरम्यान १०० वी टेक्सटाईल रेल्वेगाडी रवाना करून एक महत्त्वाचा टप्पा गाठला. पाच महिन्यात या एक्स्प्रेसने तब्बल १०.२ कोटींचे उत्पन्न पश्चिम रेल्वेला मिळवून दिले आहे.
१ सप्टेंबर रोजी रेल्वे आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी पहिल्या टेक्सटाईल गाडीला उधना येथे हिरवा झेंडा दाखवून ती रवाना केली होती. पाच महिन्यांमध्ये टेक्सटाईल एक्स्प्रेसने १०० व्या फेरीचा टप्पा गाठला. यातून सुरतमधील वस्त्रोद्योग क्षेत्राचा रेल्वेवरील विश्वास वृद्धिंगत होत असल्याचे दिसून येते. पूर्व मध्य रेल्वेमधील दानापूर आणि नारायणपूर तर दक्षिण पूर्व रेल्वेमधील शंकरेल, शालीमार हे प्रमुख थांबे होते. चलथानमधून ६७ आणि उधनामधून ३३ एन एम जी रेक्स भरण्यात आले होते. या वस्त्रोद्योग एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांनी १०.२ कोटी रुपयांचा महसूल रेल्वेला मिळवून दिला आहे.