Voice of Eastern

मुंबई : 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी दहावीची परीक्षा सुरळीतपणे पार पडली. कोरोनामुळे राज्यातीलच नव्हे तर देशातील अध्ययन – अध्यापन प्रक्रिया ठप्प झाली होती. प्रत्यक्षात वर्ग न भरता आँनलाईन पध्दतीने शिक्षण चालू होते. गेल्या वर्षी परीक्षा मंडळाने कोरोनामुळे परीक्षा घेतल्या नव्हत्या. यावर्षीही परीक्षा घेण्याचे आव्हान शिक्षण विभागाला होते. कोरोनाची दूसरी लाट नंतर ओमिक्रॉनचे संकट. विद्यार्थ्यांचे परीक्षा न घेण्यासाठी आंदोलन यामुळे या परीक्षा सुरळीतपणे पार पडतात की नाही अशी शंका निर्माण झाली होती.

शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी हे आव्हान सहजपणे पेलले. विद्यार्थी, पालक, शिक्षक संघटना व शिक्षण तज्ज्ञांशी सतत संपर्कात राहून परीक्षा कशाप्रकारे घेण्यात येतील याचे आयोजन परीक्षा मंडळाचे अधिकारी, शिक्षण अधिकारी यांच्याशी त्या चर्चा करीत होत्या. शिक्षण विभागाचे अधिकारी विकास गरड, शरद गोसावी, दिनकर पाटील, दत्तात्रय जगताप, अशोक भोसले, कृष्णकांत पाटील, महेश पालकर, राजेश कंकाल, विवेक गोसावी, संदिप संगवे, अनिल साबळे, सुभाष बोरसे यासारखे अनेक अधिकारी गेली दोन वर्षे कोरोनाच्या काळात सतत कार्यरत राहून शिक्षण विभागाची धुरा शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडत होते.

शिक्षक, व अधिकाऱ्याच्या सुचनांनुसार प्रथमच ज्या शाळेत विद्यार्थी शिकत आहेत त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची व्यवस्था करावी अशी सुचना करण्यात आली. काम आव्हानात्मक होते. गैरप्रकार होतील. परीक्षा सुरळीतपणे पार पडणार नाहीत, कॉपीचे प्रमाण वाढेल, परीक्षेची विश्वासार्हता संपुष्टात येईल अशी आवई उठवण्यत आली. विद्यार्थ्यांना हाताशी धरून राज्यात आंदोलन करण्यात आले. अशा परिस्थितीत शिक्षण विभागाने राज्यातील दहावीची परीक्षा सुरळीतपणे पार पडली. गैरप्रकारांना आळा बसला. शिक्षक, विद्यार्थी,व मुख्याध्यापकांनीही विश्वासार्हता जपली. याचे खरे श्रेय जाते ते राज्यातील शिक्षकांनाच.

शिक्षण विभागाचे भरारी पथक, शिक्षण निरीक्षक कार्यालयातील अधिकारी वर्ग व मुख्यध्यापक या सर्वांनीच परीक्षा काळात जबाबदारीने उल्लेखनीय कामगिरी केली. याचे फलीत म्हणून दहावी-बारावीच्या परीक्षा सुरळीतपणे पार पडल्या. शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी आपल्या शिक्षण विभागाचे अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकांच्या समन्वयाने कोरोनाकाळातील कठीण परीक्षा पार पाडली

Related posts

देशातील स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर

इंडिया पोस्ट पेमेंट बँकने ओलांडला पाच कोटी ग्राहकसंख्येचा टप्पा

Voice of Eastern

खारघर उष्माघात मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल न केल्याने आपची न्यायालयात धाव; २६ मे रोजी होणार सुनावणी

Leave a Comment