मुंबई :
कोविड-१९ चा संसर्ग झालेली व्यक्ती खोकला, घसा खवखवणे, डोकुदुखी, भूक न लागणे, चव जाणे, अॅसिडिटी, जुलाब, ताप व श्वास घेण्यास त्रास होणे अशा काही लक्षणांचा सामना करते. त्यामुळे अशा स्थितीमध्ये व्यक्तीने योग्य आहाराचे सेवन केल्यास या लक्षणांवर ते प्रभावी ठरेल आणि पोषण देखील होईल. कोविड-१९ संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये मूड, चव व भूक मंदावते, ज्यामुळे सेवन करण्यात येणारा आहार सर्वोत्तम असण्यासोबत विविध स्वादांनी आणि सूक्ष्म व आवश्यक पौष्टिक घटकांनी संपन्न असावा, असा सल्ला माहिम येथील फोर्टिस एसएल रहेजा हॉस्पिटल येथील डायटेटिक्सच्या विभागप्रमुख राजेश्वरी व्ही शेट्टी यांनी दिला.
महामारीचा प्रादुर्भाव सुरू झाला तेव्हा बाजारपेठेत रोगप्रतिकारशक्ती वाढवणार्या खाद्यपदार्थांमध्ये प्रचंड वाढ झाली जसे ब्रेड्स, पेये, अधिक हळद असलेले खाद्यपदार्थ इत्यादी. पण संसर्गामधून बरे करेल आणि संरक्षक म्हणून कार्य करेल असा यापैकी कोणताही खाद्यपदार्थ नाही. योग्य प्रमाणात खाद्यपदार्थांचे संयोजन आवश्यक जीवनसत्त्वे, मिनरल्स, उत्तम दर्जाचे प्रथिने, मेद, कर्बोदके आणि फायबर देईल. तसेच ते रोगप्रतिकारशक्ती हळूहळू वाढण्यामध्ये मदत करते. पण काही खाद्यपदार्थ आहेत, जे लक्षणांपासून आराम मिळण्यामध्ये मदत करतात. सूप्ससारखी गरम पेये, मटनाचा रस्सा, मसाल्याचे मिश्रण हे घसा खवखवण्यापासून आराम देते. अन्न गिळताना त्रास होत असेल तर खिचडी किंवा क्लीअर सूप्स सारखे मऊ किंवा ब्लेण्डराइज्ड खाद्यपदार्थ देता येऊ शकतात. जीवनसत्त्व क संपन्न आवळासारखी फळे दररोज सेवन करता येऊ शकतात. जुलाबामुळे डिहायड्रेशन होते, ज्यामुळे नारळाचे पाणी, केळी देता येऊ शकते.
परिपूर्ण आरोग्यदायी आहार
काही प्रमाणात तूप असलेली डाळखिचडी, दही, लिंबू कोथिंबीर सूप, रोस्टेड मसाला पापडसह काकडी व टोमॅटो, पालक राईस, धान्य मिक्स केलेली भाकरी, तूप व मीठामध्ये परतलेले ताजे ग्रीन गार्लिक, मीठ व काळीमिरीमध्ये उकळलेले व भाजलेले कंद, कॅरट बीट सूप.
प्रथिने - अंडी, दही, दूध, सोयमिल्क, पनीर, चिकन, तासे, डाळी व संपूर्ण कडधान्ये. जीवनसत्व क - आवळा, लिंबू, संत्री, पेरू इत्यादी झिंक - चणे, काजू, अंडी, पालक, मसूर, दूध ओमेगा-३ - अक्रोड, फॅटी फिश, फ्लेक्ससीड्स, चिया सीड्स, पाइन नट्स पाणी - उत्तम हायड्रेशनसाठी दररोज २ ते ३ लिटर पाणी प्या.