Voice of Eastern

ठाणे :

एफटीएल एकादश संघाने रॉयल वॉरियर्स संघाचा सात संघाचा पराभव करत ज्ञानराज स्पोर्ट्स कमिटी आयोजित मर्यादित ४५ षटकांच्या लेदर बॉल डीएससीए चषक क्रिकेट स्पर्धेत पहिला विजय नोंदवला.

सामन्यात प्रथम फलंदाजी करत रॉयल वॉरियर्सला संघाचा डाव अवघ्या ९३ धावांवर आटोपला. त्यांच्या सिध्दांत वरुणकर (२३), प्रणित कुमार (२१) आणि जय शिदेचा (१७) अपवाद वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. अनुराग ठक्करने १५ धावांत ३ आणि विक्रम पांडेने चार षटकात दोन निर्धाव षटकांसह २ धावांत ३ विकेट्स मिळवल्या. अजय पाटील आणि आकाश पाठकने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. या मर्यादित धावांचे लक्ष्य  एफटीएल एकादश संघाने ११.३ षटकात ३ विकेट्सच्या मोबदल्यात ९४ धावा करत पूर्ण केले. प्रेमचंद राजभरने ४७ धावांची महत्वपूर्ण खेळी करत संघाचा विजय सोपा केला. अजय जयस्वालने २० धावा केल्या. जय शिंदेने गोलंदाजीत छाप पाडताना एका षटकात अवघ्या तीन धावा देत एक फलंदाज बाद केला. कौस्तुभ परांजपे आणि गोविंद प्रजापतीनेही प्रत्येकी एक विकेट मिळवली.

संक्षिप्त धावफलक :

रॉयल वॉरियर्स : २७.२ षटकात सर्वबाद ९३ ( सिद्धांत वरुणकर २३, प्रणित कुमार २१, जय शिंदे १७, अनुराग सिंग ३.२-१५-३, विकास पांडे ४.२ – २- ३, अजय पाटील ४-१४-२, आकाश पाठक ५-१-१३-२) पराभूत विरुद्ध

एफटीएल एकादश : ११.२ षटकात  ३ बाद ९४ (प्रेमानंद राजभर ४७, अजय जयस्वाल २०, जय शिंदे १-३-१) सामनावीर- विकास पांडे

Related posts

हृदयात स्टेंट बसवण्यासाठी स्टेंट पोझिशनिंग असिस्टन्स सिस्टिमचा अपोलो रुग्णालयात यशस्वी वापर

‘श्यामची आई’च्या गीतांना अशोक पत्कींच्या संगीताचा साज

एसटीच्या ५९० कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात

Voice of Eastern

Leave a Comment