Voice of Eastern

मुंबई :

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण ऑनलाईन झाले असतानाही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी यंदा दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय झाला. या तणावाखाली विद्यार्थी परीक्षा देत असताना आता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर तपासण्यासाठी अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही वर्षांपासून अतिरिक्त असल्याने या शिक्षकांना निवडणूक ड्यूटी लावण्यात आली आहे. त्यामुळे आता अचानक पेपर तपासण्याची जबाबदारी सोपवल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्य मंडळाच्या निर्णयाकडून संताप व्यक्त केला जात आहे.

ऑनलाईन शिक्षणामुळे परीक्षाही ऑनलाईन घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य मंडळाकडून दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याला शहरी भागातील विद्यार्थ्यांकडून विरोधही झाला. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षेवेळी अनेक विद्यार्थी तणावाखाली असल्याचे दिसून येते. त्यातच आता राज्य मंडळाने दहावी, बारावीच्या पेपर तपासणीसाठी अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती केली आहे. दोन ते तीन वर्षांपासून अतिरिक्त असलेल्या शिक्षकांची निवडणूक कामांवर वर्णी लावलेली आहे. त्यामुळे हे शिक्षक शिकवणे सोडून निवडणुकीची कामे करत आहेत. त्यात आता या शिक्षकांना अचानक पेपर तपासणीचे काम दिले आहे. अतिरिक्त शिक्षकांचा शिकवणीपासून संबंध तुटलेला आहे. त्यांना बदललेला अभ्यासक्रम किंवा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमी केलेल्या अभ्यासक्रम याची माहिती नाही. त्यातच दोन ते तीन वर्ष शिकवण्याशी संबंध नसल्याने तसेच पेपर तपासणीचे कामही या शिक्षकांनी केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या मानसिकतेत फरक पडला आहे. त्यांना अचानक पेपर तपासणीचे काम दिल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणांवर होण्याची शक्यता शिक्षकांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांवर पेपर तपासण्याची जबाबदारी देऊ नये, अशी मागणी शिक्षक वर्गांकडून करण्यात येत आहे.

मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी

राज्य मंडळाकडून दरवर्षी शाळांकडे त्यांच्याकडील शिक्षकांची माहिती मागवत असते. अतिरिक्त शिक्षक हे अन्य ड्युटीवर असल्याने यामध्ये अतिरिक्त शिक्षकांचा समावेश केला जात नाही किंवा तसे नमूद केले जाते. त्यामुळे शाळांच्या मुख्याध्यापकांकडून राज्य मंडळाला योग्य माहिती दिली नसल्यानेच राज्य मंडळाकडून अतिरिक्त शिक्षकांवर पेपर तपासणीची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे अशा मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. काही शिक्षकांकडून ही बाब मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी सुधारित यादी मंडळाला पाठवली आहे.

Related posts

४ थी आशियाई खो-खो स्पर्धा : दुहेरी विजेतेपद पटकावत भारताकडून विजयी गुढी

विक्रांत आचरेकर फाउंडेशनच्या वतीने दादरमध्ये भव्य आंबा महोत्सव

अकरावी प्रवेशाचा अर्ज भरण्याचा सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना सराव

Leave a Comment