- मुंबई
गणपती बाप्पाची आरास नेहमीच पर्यावरण पूरक असावी असा विचार मांडणारा आणि प्रत्येक उत्सव पर्यावरण स्नेही व्हावा यासाठी झटणारा कलादिग्दर्शक ‘ सुमित पाटील ‘ यांनी यावर्षीसुद्धा देशी बियाणांपासून बाप्पाची मूर्ती आणि सजावट केली आहे.
१५० वर्षाहून अधिक जुन्या, विविध फळभाज्यांच्या बिया सजावटीसाठी वापरण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे काळ्या मातीचं रक्षण व्हावं याकरीता गेली अनेक वर्षे देशी बियाणांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी झटणाऱ्या पदमश्री, पदमविभूषण ‘ राहीबाई सोमा पोपरे’ यांनी या गणपतीची मूर्ती साकारण्यात मदत केली आहे. आपण या काळ्यामातीत रासायनिक खतं वापरली तर तिचा पोत बदलून ती नापीक होईल, परिणामी सजीवसृष्टी धोक्यात येईल असे मत सुमित यांनी मांडले.
यंदाचा उत्सव साजरा करताना निसर्गाला जपत आरोग्याकडे लक्ष देत तो साजरा केला तर आपला सर्वांगीण विकास होऊन माणूस म्हणून आपण समृद्ध होऊ. हे या ‘बी’ing human सजावटीतून दिसत आहे.