Voice of Eastern
गुन्हेताज्या बातम्यामोठी बातमी

बोरिवलीतील कचराकुंडीत सापडलेल्या नवजात मुलीचा सांभाळ पोलीस करणार

banner

मुंबई :

बोरिवलीतील कचराकुंडीत सापडलेल्या एका नवजात मुलीचा सांभाळ एमएचबी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी करणार आहेत. एमएचबी पोलीस ठाण्याची मुलगी असे या मुलीचे नाव ठेवण्यात येणार असून तिच्या शिक्षणासाठी पोलीस बँकेत पैसे जमा करणार आहेत. पोलिसांच्या या माणुसकीच्या दर्शनाचे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी कौतुक केले आहे.

बोरिवली येथील शिवाजीनगर, साईबाबा मंदिराजवळ एक कचराकुंडी आहे. दोन दिवसांपूर्वी तिथे एका बेकरी मालकाला एक नवजात बाळ सापडले होते. तिथे कुत्र्यांसह उंदीराचा वावर असल्याने त्यांनी या मुलीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. तिथे घडलेला प्रकार सांगून या मुलीचा ताबा पोलिसांना दिला. प्राथमिक तपासात काही तासापूर्वीच या मुलीचा जन्म झाला होता. तिचा जन्म लपविण्याच्या उद्देशाने तिच्या पालकांनी तिचा त्याग केला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. या बाळाची नाळदेखील कापली नव्हती. या मुलीला पोलिसांनी तातडीने कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तिची विशेष काळजी घेण्याची विनंती पोलिसांनी रुग्णालयातील कर्मचार्‍यांना केली आहे. तिची प्रकृती आता स्थिर आहे. या मुलीच्या संगोपणासाठी पोलिसांनी बालकल्याण समितीकडे पत्रव्यवहार केला आहे. बाळाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर बाल कल्याण समितीसमोर हजर केले जाणार आहे. त्यानंतर या बाळाला अंधेरीतील एका खाजगी संस्थेत ठेवले जाणार आहे. त्या बाळाचे नाव एमएचबी पोलीस ठाणे असे केले जाणार असून तिच्या भविष्यासाठी तसेच शिक्षणासाठी पोलीस काही रक्कम जमा करणार आहे. ती रक्कम बँकेत बँकेत एफडी म्हणून ठेवली जाणार आहे. दरम्यान या बाळाला सोडून पळून गेलेल्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध एमएचबी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत. त्यासाठी बोरिवली आणि कांदिवलीतील रुग्णालयात जाऊन पोलीस तपास करणार आहे.

हेही वाचा : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी घेतल्या बेकायदेशीर प्राधिकरणांच्या बैठका

Related posts

बारावीचा ‘फॉर्म १७’ भरण्यास १० जूनपासून सुरुवात

Voice of Eastern

माझे दात घाणेरडे नाही- बिग बॉसच्या घरात गायत्री दातारने सुनावले खडेबोल

अकरावी प्रवेशाच्या नोंदणी प्रक्रियेला १७ मे पासून होणार सुरुवात

Leave a Comment