Voice of Eastern

मुंबई :

राज्य सरकारने दुकानांवरील पाट्या मराठीमध्ये लावण्यासंदर्भातील निर्णय नुकताच जाहीर केल्यानंतर आता मुंबई विद्यापीठानेही मराठीचा नारा दिला आहे. मुंबई विद्यापीठाने संलग्नित सर्व महाविद्यालयांना सर्व पत्र व्यवहार, प्रवेश अर्ज, माहितीपुस्तिका, कार्यशाळा मराठीमधूनच घेण्यात याव्यात अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे यापुढे मुंबईतील महाविद्यालयांच्या नावांबरोबरच महाविद्यालयातील बहुतांश व्यवहार हे मराठीमधूनच होताना दिसतील.

संलग्न महाविद्यालयांनी त्याचे नाव सहज नजरेस पडेल, असे दर्शनी भागात मराठीमध्ये लावावे अशा सूचना मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयांना दिले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यात अडचणी येऊ नयेत यासाठी त्यांना महाविद्यालयाची माहितीपुस्तक व प्रवेश अर्ज मराठीमध्ये उपलब्ध करून द्यावे, महाविद्यालयांचा पत्रव्यवहार हा प्राधान्याने मराठीमध्ये करण्यात यावा, महाविद्यालयांच्या सूचना मराठीमधूनच लिहिण्यास प्राधान्य देण्यात यावे. तसेच महाविद्यालयांकडून दरवर्षी घेण्यात येणार्‍या विविध कार्यशाळांमध्ये प्राधान्यांने मराठीचा वापर करण्यात यावा, अशा सूचना देण्याबरोबर मुंबई विद्यापीठाने सर्व संलग्न महाविद्यालयांना २७ फेब्रुवारीला होणारा मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. मराठी भाषानिमित्त विविध चर्चासत्रे, स्पर्धा यांचे आयोजन करण्याच्या सूचनाही मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व शासकीय, अशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित पदव्युत्तर पदवी, पदवी, पदविका महाविद्यालयांचे प्राचार्य संस्थांचे संचालक यांना या सूचना मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव सुधीर पुराणिक यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.

advt

मुंबई विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या अधिसभेमध्ये युवासेनेच्या सिनेट सदस्य शीतल देवरुखकर शेठ यांनी महाविद्यालयांचे फलक मराठीमध्ये असावे तसेच विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज व माहितीपुस्तिका मराठीमध्ये उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी केली होती.

Related posts

कोरोनाचा सामना करण्यासाठी मुंबईतील रुग्णालये सज्ज

Voice of Eastern

एनआयआरएफ रँकिंगच्या टॉप १०० मध्ये महाराष्ट्रातील १२ शिक्षण संस्था

लोकसहभागातून राबविणार अंगणवाडी दत्तक धोरण

Leave a Comment