Voice of Eastern

मुंबई : 

आश्विन शुद्ध प्रतिपदा जवळ येत असल्यानं जणू निसर्गासोबतच अखिल मानवजातीला नवरात्रीचे वेध लागले आहेत. प्रतिपदेच्या दिवशी माता सिंहासनी विराजमान होताच नवरात्रींचा जागर सुरू होणार आहे. वर्षभरातील सणांपैकी एक असलेल्या नवरात्रोत्सवाची अबालवृद्ध आतुरतेनं वाट पाहतात. रसिकांची हिच आवड जोपासत तरुणाईसोबतच सर्वांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या पिकल म्युझिकनं ‘अंबे मां’ हे मातेची महती सांगणार गाणं आणलं आहे. हे गाणं सर्व वयोगटातील रसिकांना दांडियाच्या तालावर थिरकायला लावणारं आहे.

शारदा प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या ‘अंबे मां’ या गाण्याची निर्मिती वीर कुमार शाह यांनी केली आहे. दिग्दर्शक योगेश भोसले यांनी हे गाणं दिग्दर्शित केलं आहे. वृषभ शाह आणि अंकिता राऊत या मराठी मनोरंजन विश्वातील उदयोन्मुख कलाकारांवर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. पुण्यातील वाकड परिसरातील नयनरम्य आणि आलिशान लोकेशनवर शूट करण्यात आलेल्या या गाण्यात वृषभ आणि अंकितासह शंभरहून अधिक डान्सर्स आणि आर्टिस्टनी परफॅार्म केलं आहे. मुराद तांबोळी यांनी हे गाणं लिहीलं असून, पी. शंकरम यांनी गायलं व संगीतबद्ध केलं आहे. चिन्नीचेतन, सागर भोंदवेनं हे गाणं कोरिओग्राफ केलं आहे.

हे गाणं म्हणजे अंबे मातेची भक्ती आणि भक्तांचा आनंद यांचं मिश्रण असल्याची भावना व्यक्त करत योगेश भोसले म्हणाले की, मागील दीड वर्षांपासून सर्वच सणांवर अवकळा पसरलेली असताना, मरगळ आलेली असताना नवसंजीवनी देणारं एक भक्तीमय गीत अंबे मातेच्या भक्तांसाठी तयार करावं या उद्देशानं हे गाणं बनवलं आहे. केवळ धमाल मस्ती न करता त्यासोबतच अंबेमातेची भक्तीही या गाण्याद्वारे करण्यात आल्यानं तरुणाईसोबतच सर्वांचेच पाय या गाण्याच्या तालावर आपोआप थिरकतील. सहजसुंदर शब्दरचना, सुमधूर संगीतरचना, सुरेल गायन, नेत्रसुखद नृत्य आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांचा समावेश असणारं हे गाणं रसिकांना नक्कीच आवडेल अशी आशाही भोसले यांनी व्यक्त केली आहे.

Related posts

पावसाळ्यातील संकटाचा सामना करण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज

Voice of Eastern

अहमदाबाद येथील नामांकित चित्र व शिल्पकारांचे नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये सामूहिक कला प्रदर्शन

मुंबईत अवतरले आंब्याचे ३२ प्रकार !

Leave a Comment