Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशिक्षण

राष्ट्रीय ऑलिंपियाडमध्ये पालिकेच्या विद्यार्थ्यांचा बोलबाला

banner

मुंबई : 

विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेला वाव मिळावा यासाठी घेण्यात येणार्‍या राष्ट्रीय ऑलिंपियाड परीक्षेत मुंबई महापालिकेच्या शाळेतील ५० विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक पटकावले तर दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली ही राष्ट्रीय ऑलिंपियाड स्पर्धा इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयातून होते.

विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करावी यासाठी मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी दरवर्षी होणार्‍या राष्ट्रीय ऑलिंपियाड परीक्षेत सहभागी होत असतात. मुंबई महापालिका शाळांतील इयत्ता १ ली ते ८वी च्या विद्यार्थ्यांची इंग्रजी, गणित, विज्ञान प्रायमरी ऑलिंपियाड परीक्षा शैक्षणिक वर्षे २०१९-२० मध्ये घेण्यात आली होती. विभाग व शहर स्तरावर घेतलेल्या या परीक्षेला मुंबईतील पालिकेच्या शाळांमधून ६४०० विद्यार्थी बसले होते. त्यातून ३४५ विद्यार्थी राष्ट्रीय स्तरासाठी पात्र ठरले होते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्याने राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा घेण्यात आली नव्हती. प्रलंबित असलेली इंग्रजी, गणित, विज्ञान प्रायमरी ऑलिंपियाड परीक्षा राष्ट्रीय स्तरावर अखेर ऑगस्टमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेस ३४५ विद्यार्थ्यांपैकी २७२ विद्यार्थी उपस्थित होते. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, या परीक्षेत पालिकेच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकांची लयलूट करत घसघशीत यश मिळवले आहे. राष्ट्रीय ऑलिंपियाड परीक्षेत मुंबई महापालिकेच्या ५० विद्यार्थी सुवर्ण मिळवले तर दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. या परीक्षेवर उपशिक्षणाधिकारी इंदरसिंह कडाकोटी यांनी जातीने लक्ष दिल्याची माहिती महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली.

  • विषयनिहाय पदके
  • इ.१ली ते ८वी - इंग्रजी - १६
  • इ.३ री ते ८वी - विज्ञान - २४
  • इ.१ली ते ८वी - गणित - १०

Related posts

पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे मार्गाला मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची रेल्वेमंत्र्यांना विनंती

केईएमच्या डॉक्टरची क्षयरोग रुग्णालयात आत्महत्या

मुंबई महापालिका मुख्यालयात पालकमंत्री लोढांचे दालन; राष्ट्रवादी आक्रमक

Leave a Comment