Voice of Eastern
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

दोन वर्षांच्या कर्णबधिर मुलीच्या कानावर अखेर पडले शब्द; कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेला जे.जे. रुग्णालयात पुन्हा सुरुवात

banner

मुंबई :

जन्मताच कर्णबधिर असलेल्या बाळांमध्ये पुन्हा ऐकण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या कॉक्लियर इम्प्लांट सर्जरीला जे. जे. रुग्णालयात पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. १६ ऑक्टोबरला दोन वर्षांच्या एका चिमुकलीवर रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्षभरापासून ही शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आली होती. मात्र काही महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने कान, नाक, घसा विभागाने ही शस्त्रक्रिया पुन्हा सुरू केल्याने अनेक बालकांना दिलासा मिळाला आहे.

हे पण वाचा : गुड न्यूज : अखेर मुंबईत कोरोनाचा मृत्यू शून्यावर

जे.जे. रुग्णालयातील कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण, डॉ. मनीष जुवेकर व डॉ. विठ्ठल काळे यांच्या टीमने दोन वर्षांच्या चिमुकलीवर ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असते. प्रिशा गुज्जर या दोन वर्षाच्या मुलीवर शस्त्रकियेसाठी तब्बल चार तास लागले. शस्त्रक्रियेनंतर प्रिशाची प्रकृती उत्तम असून तिला व्यवस्थित ऐकूही येऊ लागले आहे, अशी माहिती ईएनटी विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण यांनी दिली. राज्यात साधारण 39 हजार मुले कर्णबधिर आहेत. देशाच्या आरोग्य आकडेवारीनुसार, जन्माला आलेल्या एक हजार मुलांमध्ये दोन मुले ही कर्णबधिर असतात. वेळेत दोष लक्षात न येणे, सर्जरीचा अवाढव्य खर्च, पालकांची आर्थिक स्थिती या कारणांमुळे शस्त्रक्रिया करण्याकडे पालकांचे दुर्लक्ष होते. यामुळे मुले कर्णबधिर राहतात. कॉक्लियर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया अंत्यत गुंतागुंतीची असून यात कानाचा हिस्सा तसेच मेंदूचा काही भाग उघडून शस्त्रक्रिया केली जातेे. शस्त्रक्रियेदरम्यान चेहर्‍याकडील नस व मेंदूकडील नस यांची हानी होण्याचीही शक्यता असते. ज्यामुळे सर्जरी करताना खूप काळजी घेणे गरजेचे असते. अत्यंत सावधपणे उपकरण कानात लावावे लागत असल्याची माहिती डॉ. मनीष जुवेकर यांनी दिली. खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियेसाठी साधारण आठ ते दहा लाख रुपये मोजावे लागतात. पण जे.जे. रुग्णालयात ही शस्त्रक्रिया विनामूल्य होत असल्याचेही जुवेकर यांनी सांगितले.

अनेक मुलांना जन्मताच ऐकू येत नसते. अशा मुलांमध्ये एक ते चार वर्षापर्यंत कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया केल्यास 90 टक्के रुग्ण बरा होता. वाढत्या वयोमानाप्रमाणे शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचे प्रमाण अल्प असते. जी लहान मुले कर्णबधिरपणाशी झुंज देत आहेत त्यांच्यावर जे.जे. रुग्णालयात उपचार करून घ्यावेत.

डॉ. रणजीत मानकेश्वर, अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय

Related posts

भांडुप, विक्रोळी व घाटकोपरमध्ये २ व ३ मार्चला पाणीपुरवठा राहणार बंद

वाढत्या गुन्हेगारीमुळे कल्याणकर दहशतीच्या सावटाखाली!

कोव्हिड-१९ मुळे प्रौढांमध्ये अल्झायमर्सचा धोका वाढला

Leave a Comment