Voice of Eastern

मुंबई :

भारतीय नौदलाने नौदल दिन साजरा करताना मुंबईत जगातील सर्वात मोठा चिरस्मरणीय राष्ट्रध्वज उभारला. तो खादीच्या कापडाने बनलेला आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या बाजूला नौदलाने नेव्हल डॉकयार्ड येथे हा भव्य आणि राष्ट्राचे प्रतिक असलेला चिरस्मरणीय ध्वज उभारला आहे. भारतीयत्त्वाचे प्रतिक असलेला हा ध्वज खादीच्या ऊंची कलात्मक वारशातून तयार झाला असून त्याची संकल्पना आणि निर्मिती खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन (केव्हीआयसी)ची आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजेच ‘आझादी का अमृत महोत्सवा’चा एक भाग म्हणून ही ध्वजउभारणी केली गेली आहे. या ऐतिहासिक क्षणी महत्त्वाच्या ठिकाणी ही ध्वजउभारणी व्हावी म्हणून ‘केव्हीआयसी’ने हे ध्वज संरक्षण दलाला सुपूर्द केले आहेत.

advt

गांधी जयंती निमित्त २ ऑक्टोबर २०२१ रोजी लेह येथे उंच शिखरावर राष्ट्रध्वज उभारला गेला. त्यानंतर ८ ऑक्टोबर रोजी भारतीय हवाईदल दिनी हिंदोन एअरबेस येथे आणि २१ ऑक्टोबर रोजी १०० कोटी कोविड लशींचा टप्पा पार केल्यानिमित्त लाल किल्ल्यावर हे राष्ट्रध्वज उभारले गेले. “भारताच्या विविधतेतील एकात्मकतेचे प्रतिक म्हणून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्ताने राष्ट्रध्वजांची उभारणी हे भारताच्या माननीय पंतप्रधानांचे स्वप्न होते. त्यातून भारताचे पुनरुत्थान, आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान आणि खादी कलाकारांची अदाकारी यांचा सन्मान केला जाणे हे उद्दिष्ट आहे. राष्ट्रध्वजांच्या माध्यमातून माननीय पंतप्रधानांचे स्वप्न तर पूर्ण होतेच आहे पण त्याचबरोबर देशवाशीयांमध्ये भारतियत्त्वाची भावना निर्माण होते,” असे उद्गार ‘केव्हीआयसी’चे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी काढले आहेत. त्यांनी भारतीय सैन्याचे विविध ठिकाणी राष्ट्रध्वज उभारणीचे जे काम त्यांनी केले त्यासाठी कौतुकही केले. या चिरस्मरणीय राष्ट्रध्वजाची लांबी २२५ फुट, रुंदी १५० फुट आणि वजन साधारण १४०० किलो आहे. तो बनविण्यासाठी ७० खादी विणकरांना ४९ दिवस लागतात. खादी विणकर आणि इतर कर्मचाऱ्यांनी या ध्वजांसाठी ३५०० मनुष्यतास अधिक काम केले आहे. तब्बल ४५०० मीटर हाताने विणलेली खादी आणि खादीचे सुत यातून हे शक्य झाले आहे. या ध्वजामधील अशोकचक्र हे ३० फुट व्यासाचे आहे.

Related posts

खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांनाही मिळणार बेस्टचा मोफत बसपास

हिंदुत्वासाठी शिवसेना – भाजप एकाच व्यासपीठावर

नवीन महाविद्यालय सुरू करताना रोजगारभिमुख अभ्यासक्रमांचा विचार करावा – उपमुख्यमंत्री

Leave a Comment