Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशिक्षण

मुंबईतील बारावीच्या रसायनशास्त्र विषयाचा पेपर फुटी प्रकरणात तथ्य नाही -वर्षा गायकवाड

banner

मुंबई :

मुंबईतील विलेपार्ले येथे रसायनयशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका व्हॉटसअ‍ॅपद्वारे प्रसारित झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिस सखोल तपास करीत आहे. रसायनशास्त्र विषयाचा पेपर फुटला या बातमीमध्ये तथ्य नाही, असे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे सांगितले.

इयत्ता बारावीची रसायनशास्त्र विषयाची १२ मार्च २०२२ रोजी प्रश्नपत्रिका फुटली अशा प्रकारच्या बातम्या समाजमाध्यमात आहेत. याबाबतची वस्तुस्थिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे सांगितली. इयत्ता बारावीची प्रश्नपत्रिका एसएससी बोर्डाच्या नियमानुसार १० मिनिटे अगोदर म्हणजे १० वाजून २० वाजता प्रश्नपत्रिका वाचनासाठी वाटप करण्यात येते व प्रत्यक्ष उत्तरपत्रिका लिखाण १०.३० वाजता सुरू करण्यास सांगितले जाते. विलेपार्ले केंद्र क्रमांक ३६०१ मुंबई येथील केंद्रावर एका विद्यार्थीनीच्या मोबाईलवर १०.२४ वाजता प्रश्नपत्रिकेतील काही भाग आढळून आला. या विद्यार्थीनीच्या मोबाईलमधील प्रश्नपत्रिकेची छाननी केल्यावर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे काही भाग पाठवण्यात आल्याचे दिसून आले. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलीस सखोल तपास करत आहेत. एसएससी बोर्डाचे अध्यक्ष यांनी केलेल्या चौकशीनुसार विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाटप केल्यानंतर म्हणजेच १०.२० वाजल्यानंतर मोबाईलवर आढळलेली आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटलेली नसून तिचा काही भाग प्रश्नपत्रिका वाटप झाल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे रसायनयशास्त्राचा पेपर फुटला यामध्ये तथ्य नसल्याचे गायकवाड यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

Related posts

सामाजिक संदेश देत जनजागृती घडवणार्‍या घरगुती गणरायाचे अनोखे रूप

महाराष्ट्र एक्सेलेंट स्टार अवॉर्डने रांगोळीकार शिवाजी चौगुलेचा गौरव

समाजाच्या आरोग्य प्रश्नांची उत्तरे शोधणे म्हणजे संशोधन –  कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर

Leave a Comment