Voice of Eastern

मुंबई : 

३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र मुंबईमध्ये अवघ्या नऊ लसीकरण केंद्रांवर लसीकरणाला सुरुवात झाली. त्यामुळे सर्वच स्तरावरून पालिकेवर टीका होऊ लागली होती, असे असतानाही अवघ्या पाच दिवसांमध्ये ५८ हजार ६७८ मुलांना कॉव्हक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात आला. मात्र आता या लसीकरणाला अधिक वेग येईल.

केंद्र सरकारने १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला ३ जानेवारीपासून परवानगी दिली. त्यानंतर मुंबईतील ९ लसीकरण केंद्रावर १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्यास सुरुवात झाली. १५ ते १८ वयोगटातील मुलांची संख्या ९ लाख २२ हजार ५१६ इतकी आहे. त्यातच २८ दिवसांत ९ लाख मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यामुळे लसीकरण मोहीमेला वेग देण्यासाठी सोमवारपासून आणखी २०० केंद्र सुरु करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

Related posts

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेमार्फत कवयित्री सम्मेलन आणि कर्तृत्त्ववान महिलांचा सन्मान

मंत्री उदय सामंत यांनी साधला आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद

यंदापासून पहिली ते १२ वी साठी पुन्हा १०० टक्के पाठ्यक्रम लागू

Voice of Eastern

Leave a Comment