Voice of Eastern

मुंबई :

मानखुर्दमधील डॉक्टर झाकीर हुसेन नाल्यांमध्ये ऑगस्टमध्ये कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडला. अनेक प्रयत्न करूनही मृतदेहांची ओळख पटत नव्हती. काय करायचे हे पोलिसांना उमजेना. अखेर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी एक भन्नाट आयडिया लढवली. या आयडियामुळे तपासाला वेग आला आहे.

मानखुर्दमधील डॉक्टर झाकीर हुसेन नाल्यांमध्ये २२ ऑगस्ट २०२१ रोजी मध्यरात्री १२ वाजता पोलिसांना एक गोणी सापडली. गोणी उघडली असता पोलिसांना त्यात एका महिलेचा अर्धनग्न स्थितीमध्ये कुजलेला मृतदेह आढळला. मृतदेहावर निळ्या रंगाची लटकन असलेली ओढणी, शरीरावर सफेद रंगाची स्लिप, पायात BS लिहिलेले चांदीची पैंजण, चांदीची अंगठी त्यामध्ये सफेद रंगाचा मोती, एका हातामध्ये लाल रंगाच्या बांगड्या आणि बनावट मंगळसूत्र होते. या व्यतिरिक्त ओळख पटण्यासारखे काहीच नव्हते. मृतदेह बरेच दिवस पाण्यात असल्याने तो कुजला होता. चेहराही खराब झाला होता. मानखुर्द पोलिसांनी हत्येचा तपास सुरू केला. मात्र अनेक दिवसांनंतरही उलगडा होत नसल्याने गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने तपास सुरू केला. मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच अन्य शहरांमधून बेपत्ता महिलांची माहिती घेण्यास सुरुवात केली. परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची झाडाझडती घेतली. मात्र महिलेची ओळख पटेना आणि आरोपी सापडेना. अखेर पोलिसांनी ही अनोखी आयडिया लावली आणि ओळख पटण्यास मदत झाली.

पोलिसांनी ही केली आयडिया

पोलिसांना अनेकदा कुजलेल्या स्थितीतील मृतदेह सापडतात. अशा मृतदेहांची ओळख पटवणे हे पोलिसांसाठी नेहमीच जिकरीचे काम असते. अशावेळी शरीराची रचना, इतर अवयव आणि मृतदेहाची कवटी यावरून अंदाज घेऊन चेहरा तयार बनवला जातो.  या तंत्रज्ञानाला थ्री डी सुपर इम्पोझिशन असे म्हणतात. या तंत्राचा वापर करून पोलिसांनी आजवर अनेक गुन्ह्यांची उकल केली आहे.

Related posts

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला जाण्यासाठी मध्य रेल्वेने सोडल्या विशेष गाड्या

रामदास आठवले, राजू शेट्टी यांची भूमिका असलेला ‘राष्ट्र’ २६ ऑगस्टला झळकणार

आता निवडणुका झाल्यास राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल – महेश तपासे

Leave a Comment