नुकताच महाराष्ट्रा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा सत्कार सोहळा मुंबई विद्यापीठातील कलीना कॅम्पस येथे पार पडला. यावेळी हा सन्मान शिवसेनेचा आहे असे वक्तव्य केले उदय सामंत यांनी केले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्यसाहेब ठाकरे यांनी जर मला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री केले नसते तर हे भाग्य माझ्या नशिबी आले नसते आणि म्हणून हा सत्कार संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसेनेचा आहे कारण शिवसेनेने मला मंत्री बनवलं आहे असे देखील उदय सामंत यांनी सांगितले.
प्राध्यापकांचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडविल्याबद्दल शिवसेना प्रणित महाराष्ट्र प्राध्यापक सेनेच्यावतीने उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांचा जाहीर सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला युवासेना सचिव वरून सरदेसाई, महाराष्ट्र प्राध्यापक सेनेचे अध्यक्ष डॉ.धनराज कोहचाडे, महादेव जगताप, प्रदीप सावंत, राजन कोळंबेकरसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्राध्यापकांचा कार्यक्रम सहसा चुकवत नाही
मी सहसा प्राध्यापकांचा कर्यक्रम सहसा चुकवत नाही असे मत देखील उदय सामंत यांनी व्यक्त केले. याचे कारण देखील यावेळी त्यांनी सांगितले. प्राध्यापकांच्या अडीअडचणी सोडवण्याची संधी मिळते. तसेच या दोन वर्षांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी देखील जीवावर उदार होऊन काय केले आहेत हे देखील प्राध्यापकांनी विध्यार्थ्यांपर्यंत पोहचवले पाहिजे. याच्यामध्ये कुठे राजकरण आहे असे मला वाटत नाही असे मत उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केले.