Voice of Eastern

मुंबई :

सप्टेंबरमध्ये हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येमध्ये मागील चार महिन्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने मुंबईला साथीच्या आजाराचा धोका अद्याप कायम आहे. मात्र २०१९ ते २०२३ या पाच वर्षाची आकडेवारीनुसार यंदा हिवताप व डेग्यूसह अन्य साथीच्या आजारांमध्ये यंदा लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. २०१९ ते २०२२ या चार वर्षांमध्ये आढळलेल्या रुग्णांचा आकडा यंदा नऊ महिन्यांमध्येच ओलांडला आहे. करोनाचा कालावधी वगळला तर २०२१ पासून साथीच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे निदर्शनास येते.

हिवताप, डेंग्यू, लेप्टो आणि गॅस्ट्रो यासारख्या पावासाळी व साथीच्या आजारांना रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतात. त्यासाठी दरवर्षी महानगरपालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यात येतात. मागील तीन वर्षांमध्ये मलेरिया व डेंग्यूच्या डासांची जवळपास २,२३, ५०४ इतकी उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यात आली. तर दरवर्षी महानगरपालिकेकडून लाखो उंदीर मारण्यात येतात. लेप्टोसाठी उंदीर कारणीभूत असल्याने त्यांना मारण्यात येते. मात्र असे असेल तरी पावसाळाजन्य व साथीचे आजार रोखण्यात मुंबई महानगरपालिकेला फारसे यश येत नसल्याचे मागील पाच वर्षांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. मुबईमध्ये २०१९ मध्ये ४३५७ हिवतापाचे रुग्ण सापडले होते. त्यानंतर या रुग्णांमध्ये सलग दोन वर्षे पाच हजारांपेक्षा अधिक रुग्ण मिळाले होते. होती. मात्र २०२२ मध्ये हिवतापाच्या रुग्णांमध्ये घट होऊन ३९८५ रुग्ण सापडले होते. मात्र यंदा पुन्हा हिवतापाच्या रुग्णांची वाटचाल पाच हजाराच्या दिशेने सुरू असून, आतापर्यंत ४ हजार ९१६ रुग्ण सापडले आहेत. त्याचप्रमाणे मागील चार वर्षांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या १२०० च्या पल्याड गेली नव्हती. मात्र यंदा थेट ३७५३ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच मागील चार वर्षांमध्ये लेप्टोचे रुग्ण संख्या ३०० पार गेले नव्हते. मात्र यंदा लेप्टोचे १२१९ रुग्ण सापडले आहेत. जुलैमध्ये सर्वाधिक ४१३ तर ऑगस्टमध्ये ३०१ रुग्ण सापडले आहेत. गॅस्ट्रोच्या रुग्णांनी यंदा ११ हजारांचा टप्पा ओलांडला असून, सर्वाधिक ११ हजार २३९ रुग्ण सापडले आहेत. तर २०१९ ते २०२२ या चार वर्षांत अनुक्रमे ७७८४, २५४९, ३११०, ५५३९ इतके रुग्ण सापडले आहेत. चिकनगुनिया आणि स्वाईन फ्लू या आजारांमध्येही सलग वाढ होताना दिसत आहे. चिकनगुनियाचे २०२१ मध्ये ८० रुग्ण साडले होते, यंदा १६२ रुग्ण सापडले आहेत. त्याचप्रमाणे स्वाईन फ्लूचे २०१९ मध्ये ४५२ रुग्ण सापडले होते. त्यांनतर २००-२०२१ मध्ये अनुक्रमे ४४, ६४ इतकी घट झाली होती. मात्र गतवर्षी त्यामध्ये पुन्हा थोडी वाढ झाली . मात्र यंदा थेट दुूपट्टीने रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

Related posts

शिवराज्याभिषेकाचे बोधचिन्ह सर्व कार्यालयात दर्शनी भागात लागणार

Voice of Eastern

दिव्यांग विद्यार्थ्यांची आंतरशालेय स्पर्धा उत्साहात 

वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांची अलिबाग समुद्रकिनारी गर्दी

Leave a Comment