Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

काशीद, मुरुड समुद्र किनार्‍यावर पर्यटकांचा शुकशुकाट

banner

नांदगाव :

गेल्या आठवड्यापासून अरबी समुद्रातील वादळी पाऊस थांबल्याने पर्यटनासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुरुड, काशीद या समुद्र किनार्‍यांबरोबरच प्रसिद्ध जंजिरा जलदुर्ग, पदमदुर्ग या पर्यटनस्थळावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येथील अशी अपेक्षा वर्तवण्यात येत होती. मात्र या सर्वच पर्यटनस्थळांवर आठवडाभरापासून शुकशुकाट दिसत आहे.

मुंबई, ठाणे, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून येणार्या पर्यटकांनी पाठ फिरवल्याने मुरूड तालुक्यातील समुद्रकिनारे ओस पडले आहेत. मुरूड, नांदगाव, काशीद, बारशीव, आगरदांडा, खोरा जेट्टी, राजपूरी जेट्टी या ठिकाणी पर्यटक येत नसल्याने व्यवसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. मुरूड तालुक्याप्रमाणेच रायगड जिल्ह्यातील सर्वच समुद्र किनार्‍यांवरही अशीच परिस्थिती असल्याने येथील पर्यटन क्षेत्रात नवरात्रौत्सवात अभूतपूर्व अशी मंदीची स्थिती निर्माण झाली आहे.

नवरात्रौत्सव असला तरी दरवर्षी पर्यटक या काळातही मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र कोरोना काळानंतर यंदा प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे. गजबजलेल्या समुद्र किनारी मोजकीच वाहने आणि पर्यटक दिसून येत आहेत. निव्वळ पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेले व्यावसायिक यामुळे हवालदिल झाले आहेत.

बहुतांश पर्यटक देवीच्या दर्शनाला

कोरोनामध्ये नागरिकांना देव- देवतांचे दर्शन दुर्लभ झाले होते. मात्र यंदा सर्व देवस्थाने पूर्णपणे खुली झाल्याने बहुतांश पर्यटकांचे पाय देवींच्या मंदिराकडे वळल्याचे दिसत आहे. यातच शाळांच्या सत्र परीक्षा सुरू झाल्या आहेत. अधूनमधून पाऊसही पडत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ऑक्टोबरमध्ये पाऊस परत फिरणार आहे. या सर्व गोष्टींचा पर्यटनावर मोठा परिणाम असल्याने रायगडातील समुद्र किनार्‍यावर पर्यटकांची वर्दळ दिसत नसून शुकशुकाटच दिसत असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.

Related posts

‘सातरस्त्याची माऊली’चे हे स्वरूप नक्की तुम्हाला आवडेल…

Voice of Eastern

महाराष्ट्रातील ११० आमदार जाणार दिल्लीत

कोरोनापासून दोन वर्षांत ७५ हजार जणांना पुरवले जेवण

Voice of Eastern

Leave a Comment