मुंबई
काही व्हायरल होणारे विडिओ पाहून नेमके मुंबईत काय चालू आहे हेच कळत नाही. मुंबईत काही दिवसांपूर्वी आपल्या पोटच्या मुलीला मारहाण करणाऱ्या पित्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला. त्यानंतर पुन्हा आज एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये एका तृतीयपंथ्याने थेट वाहतूक पोलिसांची कॉलर पकडलेली दिसतेय.
हा व्हिडिओ मुंबईतील बांगुर नगर पोलीस स्टेशन हद्दीमधला असून मध्ये भर रस्त्यात तृतीयांपंथी यांनी आपले कपडे काढून पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. रिक्षा चालक व बाईक अपघात झाला त्यानंतर रिक्षा चालकाच्या समर्थात तृतीयांपंथी त्याठिकणी आले बाईक चालक याला मारहाण करण्यासाठी गेले त्यानंतर पोलीस मध्ये गेले असताना पोलिसांनीच मारहाण केली आहे यामध्ये तीन तृतीयपंथी यांना पोलिसानी अटक केली आहे.