Voice of Eastern

मुंबई :

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा एकदा अवयवदानाला चालना मिळाली आहे. मुंबईमध्ये तीन महिन्यांमध्ये १० अवयवदानाच्या घटना घडल्या आहेत. त्यातच बुधवारचा दिवस अवयवदानाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला आहे. पंजाबमधील फाजिल्का शहरामध्ये झालेल्या अवयवदानातील फुप्फुस ग्रीन कॉरिडॉअरने थेट चेन्नईमध्ये आणण्यात आले. या अवयवदानामुळे सहा जणांना जीवदान मिळाले आहे.

पंजाबमधील फाजिल्का शहरात राहणार्‍या पूनम राणी या ३२ वर्षीय तरुणीने आपल्या जवळच्या व्यक्तीचा मेंदूमृत होऊन झालेल्या मृत्यूला न कवटाळता घेतलेल्या निर्णयाचे देशभरातून स्वागत होत आहे. पूनम राणी यांनी तातडीने घेतलेल्या निर्णयाने सहा जणांचे प्राण वाचण्यास मदत झाली. या अवयवदानाने राज्याच्या सीमा ओलांडत थेट चेन्नईमध्ये रुग्णाचे प्राण वाचवण्यास मदत झाल्याने ते अनोखे ठरले आहे. अवयवदान हे शक्यतो करून राज्यांतर्गत होत असते. परंतु काही मोजक्याच प्रकरणात ते आंतरराज्य होते. पंजाबमध्ये मेंदूमृत झालेल्या व्यक्तीचे अवयवदान करण्याचा निर्णय पूनम राणी हिने घेतला. त्यानंतर चंदीगडमधील पीजीआयएमईआर या रुग्णालयातील रुग्णांना यकृत, मूत्रपिंड आणि कॉर्निया दान करण्यात आले. तर चेन्नईमधील रक्तगट जुळत असलेल्या एका रुग्णाला फुप्फुस पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. पंजाब ते तामिळनाडूनतील चेन्नई हे अंतर फारच मोठे असल्याने दोन्ही राज्यांमध्ये ग्रीन कॉरिडोअर घेऊन विशेष विमानाने हे फुप्फुस चेन्नईला आणण्यात आले. आंतरराज्य अवयव नेण्याच्या फारच कमी घटना घडत असतात. त्यामुळे पूनम राणी यांच्या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.

Related posts

‘जेता’चे पोस्टर अनावरण ‘जेत्या’च्या पदस्पर्शाने

Voice of Eastern

मॉडर्न रात्र शाळेतील विद्यार्थ्यांना एलआयसीकडून एक हात मदतीचा 

सलमान खानसह त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी

Leave a Comment