Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशिक्षण

बारावीच्या विद्यार्थ्यांना ९ फेब्रुवारीपासून मिळणार हॉलतिकिट

banner

मुंबई : 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-एप्रिल २०२२ च्या बारावीची परीक्षा ४ मार्चपासून सुरू होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचे हॉलतिकिट ९ फेब्रुवारीला दुपारी १ वाजल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कॉलेज लॉगिनमध्ये शाळा व महाविद्यालयाला उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानंतर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाकडून हॉलतिकिट विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

मार्च-एप्रिल २०२२ च्या बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने राज्य मंडळाकडून हॉलतिकिट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ९ फेब्रुवारीला उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना हॉलतिकिटे उपलब्ध झाल्यानंतर त्याचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे. हॉलतिकिटसंदर्भात शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास त्यांना विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, अशा सूचना राज्य मंडळाकडून देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिलेले हॉलतिकिट प्रिटिंग करून देताना विद्यार्थ्यांना कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. हॉलतिकिटची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी, तसेच हॉलतिकिटमध्ये विषय व माध्यम बदल असल्यास त्याची दुरुस्ती शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करावयची आहे, अशा सूचना मंडळाने मुख्याध्यापक व प्राचार्यांना केल्या आहेत. विद्यार्थ्याकडून हॉलतिकिट गहाळ झाल्यास त्याला दुय्यम प्रत देऊन त्यावर लाल शाईने शेरा मारावा, फोटो सदोष असल्यास हॉलतिकिटवर नवीन फोटो चिकटवून संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची असल्याच्या सूचना राज्य मंडळाकडून मुख्याध्यापक व प्राचार्यांना केल्या आहेत.

Related posts

पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास जिंकू – जयंत पाटील

पीआरएन चुकलेल्या विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका मिळणार

Voice of Eastern

कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

Leave a Comment