Voice of Eastern

मुंबई :

सहावी ते दहावीच्या वर्गात शिकत असताना केलेल्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीच्या आधारे दहावीच्या परीक्षेत क्रीडागुण सवलतीचा लाभ घेता येईल. मात्र याच कामगिरीच्या आधारावर पुन्हा बारावीत क्रीडा कोट्यातील गुण मिळणार नाही. बारावीलाही क्रीडा सवलतीचे गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना अकरावी अथवा बारावीमध्ये शिकताना उल्लेखनीय क्रीडा कामगिरी करणे आवश्यक असल्याच्या सूचना क्रीडा व युवक सेवा आयुक्तांनी जारी केल्या आहेत. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने एक परिपत्रक जारी करत क्रीडा कोट्यातील सवतलतीचे गुण मिळवण्यासंदर्भातील नियम जारी केले आहेत. त्यासंदर्भातील सूचनाही जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

बारावी परीक्षेला बसलेल्या खेळाडू विद्यार्थ्याने सहावी ते बारावीमध्ये कोणत्याही वर्षात शिकताना क्रीडागुणांच्या सवलतीसाठी पात्र प्रावीण्य मिळविले असल्यास तो खेळाडू विद्यार्थी क्रीडागुण सवलतीसाठी पात्र असेल. तसेच सहावी ते आठवीमधील क्रीडा प्रावीण्याच्या आधारे विद्यार्थ्यांला क्रीडागुणांचा लाभ घ्यायचा असल्यास अशा विद्यार्थ्याने नववी अथवा दहावीमध्ये शिकत असलेल्या वर्षात आयोजित स्पर्धात किमान सहभागी होणे आवश्यक असल्याचे क्रीडा विभागाने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर दहावीच्या खेळाडू विद्यार्थ्याला क्रीडा गुण सवलतीचा लाभ घ्यायचा असल्यास विद्यार्थ्याने सहावी ते दहावीमध्ये कोणत्याही वर्षात शिकताना क्रीडागुणासाठी पात्र प्रावीण्य मिळविणे आवश्यक असून सहावीत असताना मिळविलेल्या क्रीडा प्रावीण्याच्या आधारे वाढीव गुण हवे असल्यास अशा विद्यार्थ्यांने सातवी अथवा आठवीमध्ये असताना त्या वर्षात आयोजित स्पर्धांमध्ये किमान सहभाग घेणे आवश्यक असल्याचेही क्रीडा विभागाने म्हटले आहे.

Related posts

लायन्स क्लब आयोजित जिल्हाअजिंक्यपद खो खो स्पर्धा दादर मध्ये रंगणार

शाळा सुरु होण्याआधी पाठ्यपुस्तके मिळणार – प्रा. वर्षा गायकवाड

२४, २५ मार्चला विक्रोळीमध्ये पाणीपुरवठा बंद

Voice of Eastern

Leave a Comment