विविध सामाजिक आणि शैक्षणिक चळवळींवर संशोधनात्मक लेखन करणाऱ्या युवराज नलावडे यांचे स्वातंत्र्यपूर्व काळात देशात झालेल्या शैक्षणिक, शेतकरी, कामगार आणि महिला अशा विविध चळवळींचा संशोधनात्मक अभ्यासपूर्ण आढावा घेणारे सोशल मूव्हमेंट अँड रिव्हॉल्युशन पुस्तकाचे नुकतेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत व महाराष्ट्र प्राध्यापक सेनेचे मुख्य सल्लागार तथा युवासेना सचिव वरूणजी सरदेसाई यांच्या शुभहस्ते या प्रकाशन करण्यात आले.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील फिरोजशहा मेहता भवन येथे पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. या पुस्तकामध्ये स्वातंत्रपूर्व काळातील चळवळींचा बारकाईने अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे लोकांना चळवळींचा इतिहास जाणून घेण्याची नव्याने संधी मिळणार आहे. हे पुस्तक पुढील काळात अनेक चळवळींसाठी दिशादर्शक ठरेल असे मत उदय सामंत यांनी व्यक्त केले. यावेळी, शिवसेना उपनेते श्री. विजय कदम, महाराष्ट्र प्राध्यापक सेनेचे अध्यक्ष व मुंबई विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ. धनराज कोहचाडे, प्राध्यापक सेनेचे महासचिव प्रदीप वाघमारे, महाराष्ट्र प्राध्यापक सेनेचे सल्लागार श्री. महादेव जगताप, श्री. मिलिंद साटम, डॉ. सुप्रिया कारंडे, महाराष्ट्र प्राध्यापक सेनेचे सर्व पदाधिकारी, युवासेनेचे अधिसभा सदस्य, व युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. देशातील इंग्रजकालीन वातावरणात सामाजिक सुधारणा चळवळी कशा पद्धतीने व कशाप्रकारे सुरू झाली.
देशाला आधुनिकीकरणाची दिशेने वाटचाल कसे नियोजनबद्ध पद्धतीने केले. त्यात स्त्री मुक्ती हालचालीसाठीची गती तसेच देशातील शैक्षणिक, शेतकरी व कामगार यांच्या विभिन्न प्रकारच्या चळवळीची सुरुवात व दिशा या वर संशोधनात्मक अभ्यासपूर्ण लेखन तसेच १८५७ ची क्रांती ही एका प्रकारे नियोजित चळवळ होऊ शकते यावर या पुस्तकामध्ये अभ्यासपूर्वक लेखन करण्यात आले आहे. सामाजिक सुधारणा चळवळींचा परिचय, स्त्री मुक्ती आणि सामाजिक सुधारणा, शैक्षणिक सुधारणांचा विकास, भारतीय शेतकरी चळवळ, भारतातील कामगार चळवळ, १८५७ ची महान क्रांती, क्रांतिकारी चळवळ, होमरूल आंदोलन, सविनय कायदेभंग चळवळ, जहालवादी चळवळ, स्वराज्यवादी चळवळ, मुस्लिम जातीयवाद – एक सामाजिक क्रांती अशा अनेक चळवळींविषयी माहिती या पुस्तकामध्ये उपलब्ध आहे.