Voice of Eastern

काही दिवसांपूर्वी मला शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर मी तसा घराबाहेर पडलेलो नाही, पण मी बाहेर पडायला असमर्थ नाही. मी सुद्धा शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे. माझ्या हातात तलवार नसली तरी ती कशी गाजवायची हे माझ्याही नसानसामध्ये भिनलेले आहे. त्यामुळे ती तलवार योग्य वेळी गाजवली, चालवली व फिरवलेली आहे. त्यावेळी जसे सैनिक, मावळे लाभले तसेच या काळातले वीर शिवसैनिक हे शिवसेनाप्रमुखांच्या पुण्याईने माझ्या आणि आदित्यच्या सोबत आहेत.

mararana

नुकतेच माझगाव येथे महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळा पार पडला  या कार्यक्रमास पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, मुंबईचे पालक मंत्री असलम शेख, आमदार यामिनी यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव सह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. महत्वाचं म्हणजे या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन हजेरी लावली.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

वीर महाराणा प्रताप यांचा अतिशय सुंदर पुतळा मी बनवून घेतलेला आहे, त्याचे अनावरण करण्यासाठी यशवंत अनेक दिवसांपासून माझ्या मागे लागला होता. त्याच्या आग्रहापेक्षा हट्टच अधिक होता. आज करु उद्या करु असे करता करता आजचा दिवस उजाडला. योगायोग म्हणजे आज आपल्या शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस असतो. महाराणा प्रताप यांनी त्यावेळी जी चेतना जागवली ते कार्य करणार्‍या आपल्या शिवसेना प्रमुखांचा आज जन्मदिवस. मी महाराणा प्रताप यांच्याविषयी जास्त बोलणार नाही. मी यशवंत यांना खास धन्यवाद देतो. महाराणा प्रताप यांच्याबद्दल खूप काही बोलता येईल. पण आपल्याला महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज होता येणार नाही. पण महाराणा प्रताप यांना चेतक घोड्याने २२ फुटांच्या नाल्यावरुन उडी मारुन वाचवले. त्यानंतर जीव सोडला. अशा पराक्रमाचे आपण पुजारी व्हायचे.

Related posts

साखर निर्यातीत भारत बनला जगातील दुसर्‍या क्रमांकाचा देश

बदलापुरातील नरेकर कुटुंबियांनी साकारला भातुकली खेळणारा बाल गणेश

Voice of Eastern

कर्णबधिरांनी कर्णबधिरांसाठी भरवेलेली ‘चेंबूर प्रिमियम लीग’ उत्साहात

Voice of Eastern

Leave a Comment