Voice of Eastern

मुंबई : 

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी यूजीसीने मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) १७ अभ्यासक्रमास परवानगी दिली आहे. यानुसार आयडॉलचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. यावर्षी यूजीसीने आयडॉलच्या एमए भूगोल व एमएमएस (एमबीए) या नवीन अभ्यासक्रमास परवानगी दिली. पुढीलवर्षी एमए मानसशास्त्र, एमएसडब्ल्यू, पत्रकारिता यासारखे इतरही अनेक नवीन अभ्यासक्रम आयडॉलमधून सुरू केले जातील, असे आयडॉलचे संचालक डॉ.प्रकाश महानवर यांनी सांगितले.

हे पण वाचा : आयडॉलमधील सुधारणांसाठी तब्बल पाच वेळा आणला स्थगन प्रस्ताव; सिनेट सदस्य ऍड. वैभव थोरात यांच्या पाठपुराव्याला अखेर यश

कोविडमुळे यूजीसी-डीईबीने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या जुलै सत्राची सुरुवात नोंव्हेंबरपासून सुरू करण्याचे ठरविले. यानुसार यूजीसीने या शैक्षणिक वर्षासाठी विविध अभ्यासक्रमाच्या मान्यतेची प्रक्रिया नुकतीच पूर्ण केली. यानुसार मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या १७ अभ्यासक्रमास यूजीसीने परवानगी दिली आहे. मागील वर्षी १५ अभ्यासक्रमास परवानगी देण्यात आली होती. एमएमएस (एमबीए) व एमसीए हे दोन अभ्यासक्रम व्यावसायिक असल्याने याची प्रवेश परीक्षा लवकरच घेतली जाईल. या दोन्हीही अभ्यासक्रमाला युजीसीबरोबरच एआयसीटीईचीही मान्यता मिळाली आहे. एआयसीटीईने आयडॉलला एमएमएस (एमबीए) च्या ७२० जागा तर एमसीएच्या २००० जागांना मान्यता दिली आहे. यातील एमसीए हा अभ्यासक्रम यावर्षीपासून दोन वर्षाचा करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठ प्रथमच एमएमएस (एमबीए) हा अभ्यासक्रम दूरस्थ माध्यमातून चालविणार आहे. यासाठी आयडॉलला मुंबई विद्यापीठाची बजाज व्यवस्थापन संस्था व अल्केश दिनेश मोदी व्यवस्थापन संस्था शैक्षणिक सहकार्य करीत आहेत.

मुंबई विद्यापीठातून दूरस्थ माध्यमातून व्यवस्थापनाचा एमबीए अभ्यासक्रम सुरू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती. एआयसीटीई व यूजीसीची परवानगी मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांचे एमबीएचे स्वप्न पूर्ण होईल.
– डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

प्रथम वर्ष प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच जाहीर

पदवी स्तरावरील प्रथम वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी आयटी व बीएस्सी संगणकशास्त्र व पदव्युत्तर स्तरावरील प्रथम वर्ष एमए, एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमएस्सी आयटी, एमसीए व एमएमएस (एमबीए ) याच्या प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल.

हे पण वाचा : मुंबई विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा ; नॅक कडून पाच ऐवजी सात वर्षांसाठी मुदतवाढ

आयडॉलमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यमासंदर्भात चार वर्षांपासून पत्रव्यवहार आणि अधिसभेच्या माध्यमातून विद्यापीठाकडे पाठपुरावा करत होतो.  अखेर युवासेनेच्या पाठपुराव्याला यश मिळाले.

– वैभव थोरात, युवासेना सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ

Related posts

युक्रेन आणि आसपासच्या देशांतून १६ हजारपेक्षा जास्त भारतीय मायदेशी आणले

हनुमान चाळीसानंतर आता अक्षय्य तृतीयेला मनसेची महाआरती

वाढत्या कोरोनाबरोबरच बनावट सॅनिटायझरच्या उत्पादनातही वाढ!

Voice of Eastern

Leave a Comment