Voice of Eastern

मुंबई : 

आशयघन चित्रपट नेहमीच आपल्या नावामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. मराठी चित्रपट आत्ता आपल्या दर्जेदार कथानकामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही वाहवा मिळवून लागले आहेत. अशाच पठडीतला ‘गुल्हर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘गुल्हर’ चित्रपटाचं मोशन पोस्टरचे नुकतंच लाँच झालं आहे.

शांताराम (आप्पा) मेदगे, अनुप शिंदे, अबिद सय्यद आणि शिवाजी भिंताडे यांनी आयडियल व्हेंचर आणि आर. के. फिल्मच्या बॅनरखाली ‘गुल्हर’ची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक रमेश चौधरी यांनी ‘गुल्हर’ची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. यापूर्वी अनेक चित्रपटांचे सहाय्यक दिग्दर्शन केल्यानंतर त्यांनी ‘बाबो’ चित्रपटाद्वारे दिग्दर्शन करण्यास सुरुवात केली. नुकत्याच रिलीज झालेल्या मोशन पोस्टरनं चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिक ताणण्याचं काम केलं आहे. या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्येही काहीसं अनोखेपण जाणवतं. आर. के. फिल्म्स आणि आयडियल व्हेंचर प्रस्तुत या नावाने मोशन पोस्टरची सुरुवात होते. उत्सुकता वाढवणाऱ्या पार्श्वसंगीतासह मोशन पोस्टर पुढे सरकतं. त्यानंतर समोर येणाऱ्या कोऱ्या फळावर ‘गोष्ट एका उनाड मनाची’ ही टॅगलाईन आणि त्यामागोमाग ‘गुल्हर’ हे टायटल येतं. अचानक फळा असलेली भिंतच तुटते आणि फळ्यालाही तडा जातो. यातूनच ‘गुल्हर’मध्ये काय पहायला मिळणार याबाबत कुतूहल निर्माण होतंय.

चालीरीतींविरोधात आवाज उठवत प्राणीमात्रांवर दया करायला शिकवणारी गोष्ट ‘गुल्हर’मध्ये आहे. चित्रपटात विनायक पोद्दार, भार्गवी चिरमुले, रवी काळे, माधव अभ्यंकर, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे, किशोर चौगुले, सुरेश विश्वकर्मा, रुक्मिणी सुतार, शिवानी बावकर,  मंजिरी यशवंत आदींच्या मुख्य भूमिका आहेत. मोहन पडवळ यांनी चित्रपटाची कथा तर, संजय नवगिरे यांनी पटकथा व संवादलेखन केले आहे. छायालेखन व संकलनाची जबाबदारी कुमार डोंगरे यांनी सांभाळली आहे. चित्रपटातील गीतांना संगीतकार पद्मनाभ गायकवाड यांनी संगीत दिलं असून विशाल पाटील यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. पार्श्वसंगीत केदार दिवेकर तर साऊंड डिझाईन निखिल लांजेकर आणि हिमांशू आंबेकर यांचे आहे. निर्मिती व्यवस्थापक म्हणून शशी भालेराव व सुभाष हांडे यांनी काम पाहिलं आहे.

Related posts

नरसोबावाडी येथे राज्य मानांकन स्पर्धेला सुरुवात

आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवा; लसीकरणाला पुन्हा गती द्या

Voice of Eastern

मुंबई पुणे एक्स्प्रेसवर विचित्र अपघात; सहा वाहनांचा चक्काचूर

Voice of Eastern

Leave a Comment