Voice of Eastern

मुंबई

एका बाजूला राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना दुसऱ्या बाजूला लसीकरणाचा वेग वाढताना दिसत आहे. लसीकरण अजून मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठी राज्याचे उच्च तंत्र व शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ आणि कॉलेजमध्ये देखील शिक्षक तसेच विद्यार्थ्यांचे लसीकरण मोठ्या मोठ्याप्रमाणात करावे असे आदेश दिले आहे. याच अनुषंगाने गिरगांव येथील भवन्स हजारीमल सोमाणी कॉलेज येथे विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांसह इतर नागरिकांनी सुद्धा याचा लाभ घेतला. या उपक्रमाचे उद्घाटन मुंबई शिक्षण विभागाचे सह संचालक डॉ सोनाली रोडे यांच्या हस्ते करण्यात आला.

लसीकरण मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांचे मनापासून आभार. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला मोलाचे सहकार्य करणारे महानगर पालिकेचे डी वार्ड येथील सर्व कर्मचारी आणि कॉलेज येथील एन एस एस युनिटचे मी विशेष आभार मानतो.

– डॉ श्रीमंत राठोड, प्राचार्य, भवन्स कॉलेज

Related posts

व्हॉटसअ‍ॅपवरही नागरिकांना मिळणार डिजी-लॉकर सुविधा

शिष्यवृत्ती परीक्षेला राज्यातून साडे पाच लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

एमएचटी सीईटी परीक्षा ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता

Leave a Comment