Voice of Eastern

मुंबई : 

राज्य सरकार तसेच पालिकांच्या आरोग्य विभागांकडून मुलांना लसवंत करा असे कितीही सांगितले जात असले तरी लसीकरण केंद्रांवर मुलांची गर्दी दिसून येत नाही. मुलांच्या परीक्षा, पालकांची अनिच्छा तसेच मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणामाची शक्यता अशी कारणे पुढे केली जात आहेत. मात्र चौथ्या लाटेच्या परिणामाबाबत एवढ्यात काही सांगू शकत नाही, त्यामुळे प्रत्येक मुलाला लस द्या असे आवाहन कोरोना टास्क फोर्स तसेच वैद्यकीय तज्ज्ञांकडून वारंवार करण्यात येत आहे.

१५ ते १८ वयोगटातील मुलांचे ३ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. आतापर्यंत ६ लाख १२ हजार ४६१ लाभार्थींपैकी ३ लाख ३५ हजार ४३८ जणांनी पहिला डोस घेतला. तर २ लाख ४१ हजार ९४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. १५ ते १८ वयोगटातील लसीरकणात मुंबई अद्याप २९ व्या क्रमांकावर आहे. मुलांच्या धीम्यागतीच्या लसीकरणावर बोलताना राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, पालकांमध्ये लसीबाबत संकोच असल्याचे दिसून येत आहे. सध्या कोविड रुग्णांमध्ये घट होत असल्याने लसीला प्राधान्य दिले जात नाही. मात्र यात मुलांनी पुढे येऊन पालकांना शिक्षित केले पाहिजे. यातून त्यांना लस मिळेल. तर सध्या मुलांच्या परीक्षा सुरु असून यातील बरेच जण सुटीवर गेले आहेत. त्यामुळे लसीकरण कमी होण्याची शक्यता राज्य लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी व्यक्त केली. दरम्यान लस केंद्रांवर गर्दी नाही. मात्र मुंबईत लस उपलब्ध असल्याने मुलांनी वेळ वाया घालवू नये. यातून शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लसीकरण शिबिरे आयोजित करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे पालिका अधिकार्‍याने सांगितले. मात्र पालकांचा सकारात्मक प्रतिसाद हवा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Related posts

‘उच्च व तंत्र शिक्षण विभाग विद्यापीठाच्या दारी’ उपक्रमाला सुरुवात; प्रलंबित प्रकरणे लावणार मार्गी

प्रत्येक शिधापत्रिकाधारकांपर्यंत धान्य पोहोचवावे – मंत्री छगन भुजबळ

शरद पवार कृषीमंत्री असताना ७० हजार कोटीचे शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तुम्ही काय केलं? – महेश तपासे

Leave a Comment