Voice of Eastern

मुंबई

शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून मंगळवारी २८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या पहिल्या सत्रात, शिक्षक तसेच १८ वर्ष व त्यावरील वयाचे विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच सोमवारी २७ सप्टेंबर राेजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत, फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण करण्यात येणार आहे.

मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांवर दोन दिवस हे लसीकरण करण्यात येणार आहे. मंगळवारी २८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या पहिल्या सत्रात, शिक्षक तसेच १८ वर्ष व त्यावरील वयाचे विद्यार्थ्यांचे लसीकरण होईल. याच दिवशी दुसऱ्यासत्रात दुपारी ३ ते रात्री ८ यावेळेत, दुसरा असणाऱ्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तर सोमवारी २७ सप्टेंबर राेजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत, फक्त महिलांसाठी राखीव लसीकरण करण्यात येणार आहे.

दोन्ही दिवशी, मुंबईतील सर्व शासकीय व महानगरपालिका लसीकरण केद्रांवर थेट येवून नागरिकांना लस घेता येईल. त्यासाठी ऑनलाईन पूर्व नोंदणीची आवश्यकता नाही. पात्र लाभार्थ्यांनी येताना, शासकीय ओळखपत्र आणणे आवश्यक असेल. तसेच शिक्षक व विद्यार्थी यांनी शैक्षणिक संस्थांचे ओळखपत्र देखील सोबत आणणे आवश्यक आहे. लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी पालिका देखील प्रयत्नशील आहे. त्यासाठी या विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

Related posts

मंत्रा कुऱ्हेची सागरी भरारी

Voice of Eastern

मुंबई विभागातील या ४३६ महाविद्यालयांचा निकाल लागला आहे १०० टक्के

Voice of Eastern

वाय‌. एम. टी. आयुर्वेद मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थीनींची रिसर्च पोस्टर स्पर्धेत बाजी

Leave a Comment