समता विद्या मंदिर शाळेने साकारला व्हेक्सीनरुपी आकाश कंदिल
मुंबई
साकिनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत दिवाळीचा व्हेक्सीनरुपी आकाश कंदील साकारण्यात आला आहे. देशात शंभर करोड डोस पूर्ण झाले असून नागरिकांनी कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरण करून घ्यावे असा संदेश या कंदीला मार्फत देण्यात आला आहे. .
संपूर्ण देशात कोरोना साथीने कहर केला असता ‘शाळा बंद पण शिक्षण चालू’ त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांची फार मोठी कोंडी झाली होती. अशाही परिस्थितीत साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेने ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवले होते. रुग्ण संख्या हळूहळू कमी झाल्यावर शासनाने 4 सप्टेंबर पासून आठवी ते दहावीचे वर्ग सुरू करण्याची शाळांना परवानगी दिली. या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन समता शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष राजेश सुभेदार यांच्या संकल्पनेतून व्हेक्सीनरुपी आकाश कंदीला च्या माध्यमातून कोरोना साथीचे समूळ उच्चाटन करण्याचा संदेश या वर्षीच्या दीपावलीच्या पहिल्या दिवशी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक व समाजाला दिला आहे.
अंधारातून प्रकाशाकडे. अंधारावर उजेडाने केलेली मात. वाईटावर चांगल्याचा विजय असा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आलेल्या संकटावर मात करून दिवाळीचा सण आनंदाने साजरा करावा. फटाके विना दिवाळी पर्यावरणपूरक दिवाळी साजरा करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
शाळेमध्ये नवीन नवीन उपक्रम राबवतो याचं कारण मध्ये पुस्तकी ज्ञानाबरोबरच इतर ज्ञान ही मिळावं यासाठी आम्ही असे विशेष उपक्रम राबवतो. जवा शाळा बंद होते ऑनलाईन अभ्यास सुरू होता तेव्हा देखील आम्ही वेगवेगळे उपक्रम घेत होतो. ज्यांनी लसीकरण केले नाही त्यांनी जास्तीत जास्त लस ती घ्यावी यासाठी आम्ही हा आगळावेगळा लसीकरणाचा कंदील तयार केला आहे आणि यामध्ये लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करतात असे शाळेचे कार्याध्यक्ष राजेश सुभेदार यांनी सांगितले