Voice of Eastern
  • विक्रोळी

विक्रोळी येथे वनिता फाउंडेशन, जयेश खाडे उद्योजक विकास केंद्र, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ विभागीय कार्यालय ठाणे, डॉ. माने मेडिकल फाउंडेशन व रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने निराधार गरीब गरजू व ज्यांचे पती कोरोनाच्या काळात व कोरोनाने निधन झाले, अशा महिलांना सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने नुकतीच महाराष्ट्र कामगार कल्याण भवन विक्रोळी येथे महिलांसाठी एक दिवसीय महिला उद्योजकता विकास व्यवसाय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा व राज्यमंत्री दर्जा प्राप्त माननीय ज्योतीताई ठाकरे व जयेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. जयेश खाडे यांनी कॉर्पोरेट leather bags And non leather Gifts branded ladies top मोफत वाटप केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनिता फाऊंडेशनचे संस्थापक प्रभाकर तुकाराम कांबळे होते.

माविमच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे व जयेश खाडे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात निराधार गरीब गरजू व ज्यांचे पति कोरोनाच्या काळात व कोरोनामुळे निधन झालेले आहेत अशा महिलांनी स्वतःच्या पायावर उद्योग सुरू करण्यासाठी वनिता फाउंडेशन च्या बॅनरखाली एकत्र येऊन शासनाच्या विविध योजना व अनुदानासंबंधी घरबसल्या माहिती घेण्यासाठी व उद्योग सुरू करण्यासाठी सर्व महिलांनी संघटित होऊन स्वतःच्या कुटुंबाला सावरण्यासाठी स्वतःचा उद्योग सुरू करावा, त्यासाठी आम्ही शासनाच्यावतीने सहकार्य करायला तयार आहोत असे आवाहन महिला उद्योजकता व्यवसाय कार्यशाळेत केले. जयेश खाडे यांनी startup business कसा करावा, विविध शासकीय योजना 80% ग्रँट, विविध शासकीय योजना यांची माहिती दिली.

महिला उद्योजकता विकास कार्यशाळेची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यशाळेचे सूत्रसंचालन मैत्री संस्थेचे अध्यक्ष सुरज भोइर यांनी केले. तसेच प्रमुख अतिथी व मार्गदर्शक सामाजिक उद्योजक व वर्ल्ड ट्रेड सेंटरचे नवी मुंबई मानद सल्लागार जयेश खाडे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ विभागीय कार्यालय ठाणे प्रभारी सहाय्यक कल्याण आयुक्त नितीन पाटील, कार्यसम्राट नगरसेविका मनिषा ताई रहाटे सामाजिक कार्यकर्त्या केतकी ताई सांगळे , प्रसिद्ध समाजसेवक डॉक्टर योगेश भालेराव, डिजिटल महाराष्ट्र संध्याचे महेंद्र कदम, ईश्वरा लाईफ फाऊंडेशनचे संचालक सुवी स्वामी, ललित बेकरीचे देवेंद्र अडसूळ यांनी bakary बिझिनेस कसा करावा व घरातून बिझनेस कसा करावा तसेच मोफत bakary प्रोडक्स वाटप करण्यात आले. शेफ चेतक घेगडमल व वनिता फाउंडेशनच्या अध्यक्ष वनिता कांबळे व जयेश खाडे ज्योती ठाकरे ताई आदी मान्यवरांनी उपस्थित महिलांना उद्योजकता विकास व्यवसाय संबंधी मार्गदर्शन केले.

दिवसीय महिला उद्योजकता व्यवसाय कार्यशाळेत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कल्याण निरीक्षक सायली नाईक, खाडे उद्योजक केंद्राच्या अनिता खाडे, दि महाराष्ट्रीय ऐकयवर्धक सहकारी पतपेढीचे संचालक संतोष गुप्ता‌, राष्ट्रवादीचे सुरज रिडलान, दिपक पाटील, कपिल क्षीरसागर ,सिमरन खराडे, दिपाली मेस्त्री, आदर्श मुंबई चे संपादक संजय भोईर पत्रकार नवनाथ कांबळे, अविनाश माने, प्रवीण आंबेकर आदीची उपस्थिती लाभली. या कार्यशाळेसाठी कार्यसम्राट नगरसेविका मनिषा ताई रहाटे, सुरज रिडलान, विजय कदम, वार्ड अध्यक्ष देवेंद्र डोके, डॉक्टर योगेश भालेराव, महाराष्ट्र कामगार कल्याण भवन चे नितीन पाटील काशिनाथ बारामते, सामाजिक उद्योजक जयेश खाडे आदींनी मोलाचे सहकार्य केले. वनिता फाउंडेशनचे कार्याध्यक्ष सुनील निकाळे, मृण्मयी मिलींद निकाळे ,कविता सुभाष निकाळजे , मैत्री मनोज निकाळे, सम्यक निकाळे, समाजसेवक राजेंद्र कांबळे, कामगार कल्याण भवन च्या संजना कोळकर व कर्मचारी आदिनी या कार्यशाळेसाठी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित सर्व महिलांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महिला उद्योजकता विकास व्यवसाय कार्यशाळा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. . जयेश खाडे यांनी जास्तीतजास्त महिला उद्योजक झाले पाहिजे ही काळाची गरज आहे. महिलांनी आर्थिक विकास कारणासाठी मार्गदर्शन व पुढील प्रोग्राम लवकरच पुढील काळात घेऊ असे आश्वासन दिले. पुढील प्रोग्रॅमसाठी नाव नोदणी : प्रभाकर कांबळे 8425899043 आणि जयेश खाडे 8828010102 आणि 7666002002

Related posts

मुंबईतील दोन शाळा राष्ट्रीय स्तरावर ठरल्या सर्वोत्कृष्ट

कोविडची बूस्टर मात्रा मोफत देण्याच्या महाराष्ट्रात अंमलबजावणी करणार – शिंदे

अंधेरीत उद्यापासून रंगणार ‘मुंबई श्री’चे पोझयुद्ध

Voice of Eastern

Leave a Comment