मुंबई
एका बाजूला येत्या काही दिवसातच आता नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे, तर दुसऱ्या बाजूला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्रोत्सव कसा साजरा करायला हवा यावर बृहन्मुंबई महानगरपालिकेने काही मार्गदर्शक सूचना जाहीर केले आहेत. या मध्ये मुंबईत गरबा आयोजनाला परवानगी नाकारण्यात आली आहे. या सोबतच मुंबईतील सर्व मंडळांना मूर्तीच्या उंची संदर्भात मर्यादा देखील लावण्यात आले आहेत. तसेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एका पत्रकार परिषदेत मुंबई वगळता राज्यात कोविद नियमांचे पालन करत गरबाला परवानगी दिली आहे.मात्र आता यावर मुंबईतील सर्वच नवरात्रोत्सव मंडळांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
हे पण वाचा – पालिकेने घातल्या या अटी
‘ब्रेक-द-चैन’ या मोहिमेच्या अंतर्गत आता ७ ऑक्टोबर पासून राज्यात कोरोनाच्या नियमांचे पालन करत जर मंदिरं उघडायचा निर्णय, विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेत आहेत, तर मग नवरात्रोत्सवसाठी एवढं बंधनं कशाला? असा संतप्त सवाल सातरस्त्याची माऊली मंडळाचे मानद सचिव आशिष नरे यांनी नमूद केला.
हे पण वाचा – मुंबईची माऊली तेलंगणाच्या मंदिरात
उत्सव परंपरा सोबत मंडळांना सामाजिक भान सुद्धा आहे. आगमन आणि विसर्जना सोहळ्याला मिरवणुकीची परवानगी नको. मात्र शासनाने यंदा उत्सवासाठी काही प्रमाणात थोडी तरी सूट द्यावी अशी अपेक्षा होती असे मत संतोषी माता मंदिर ट्रस्टचे कार्यकारिणी सदस्य निखिल बागुल यांनी व्यक्त केले.
हे पण वाचा – राज दरबारात आर्थर रोडची आई संतोषी माता…
गणपती विसर्जनानंतर सर्वांना आतुरता होती आपल्या लाडक्या माऊलीची. तब्बल विसर्जनाच्या १० दिवसानंतर म्हणजेच ३० सप्टेंबर रोजी महानगर पालिकेने नवरात्रोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. मात्र अवघ्या ७ दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवात देवीच्या मूर्तीच्या उंचीवर एवढे बंधनं कशाला? देवीच्या मूर्तीला दागिने आणि आभूषणांनी सजविले जातात. सध्या मंडळांची आर्थिक स्थिती एवढी सक्षम नाही के हे नवीन दागिने एवढ्या कमी वेळात बनवून मिळेल . तसेच हेच नियम लाडायचे होते तर आधीच पालिकेने नियमावली जाहीर करायला हवी होती. पालिका प्रशासनाने एवढा विलंब का केला? असे मत वाकोला येथील नावयुगची माऊली मंडळाचे संपर्क प्रमुख रोशन आंबेकर यांनी व्यक्त केले.
गेल्यावर्षी अत्यंत साधेपणाने नवरात्रोत्सव साजरा करण्यात आली होती. मात्र यावर्षी तरी शासनाने दिलेल्या नियमांचा फेरविचार करावा आणि काही प्रमाणात सूट द्यावी अशी नम्र विनंती.
– राहुल शिरगांवकर, सचिव, मुंबईची नवरात्री संस्था