ठाणे :
विजय यादवच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई स्पोर्टिंग युनियनने माही स्पोर्ट्सचा चार विकेट्सनी पराभव करत मर्यादित ४५ षटकांच्या डीएससीए चषक वासंतिक क्रिकेट स्पर्धेत पहिला विजय नोंदवला.
ज्ञानराज स्पोर्ट्स कमिटी आयोजीत स्पर्धेच्या उदघाटनीय सामन्यात माही स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना ४३ षटकात १८० धावांपर्यत मजल मारली. संघाच्या धावसंख्येत महत्वाचे योगदान देणाऱ्याआर्यन पालांडेला एका धावेने अर्धशतकाने हुलकावणी दिली. त्याने ४९ धावा केल्या. जयप्रकाश गोडने २६ आणि प्रकाश जैस्वारने २१ धावा केल्या. सिद्धेश पडेलने २९ धावांत ३ विकेट्स मिळवल्या. रोहित ठाकुर आणि तेजसने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. मुंबई स्पोर्टिंग युनियनने विजयाचे हे आव्हान ३६ व्या षटकात सहा फलंदाजांच्या मोबदल्यात १८१ धावा करत पूर्ण केले. संघाच्या विजयात मोलाचे योगदान देताना विजयने ६० धावा केल्या. रोहित ठाकूरने नाबाद २६ तर सिद्धेश पडेलने नाबाद १४ धावा करत फलंदाजीतही उपयुक्तता सिद्ध केली. प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत आणताना प्रकाश जैस्वारने ३३ धावांत ३ विकेट्स मिळवल्या. विजय यादवला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक :
माही स्पोर्ट्स : ४३ षटकात सर्वबाद १८० ( आर्यन पालांडे ४४, जयप्रकाश गोंड २६, प्रकाश जैस्वार २१, सिद्धेश पडेल ८-१-२९-३, रोहित ठाकुर ८-१-१३-२, तेजस ६-०-२७-२) ४ विकेट्सनी पराभूत विरुद्ध मुंबई स्पोर्टिंग युनियन ३६ षटकात ६ बाद १८१ ( विजय यादव ६०, रोहित ठाकूर नाबाद २६, सिद्धेश पडेल नाबाद १४, प्रकाश जैस्वार ५-०-३३-३, निहाल झा ४-१-११-१, फिरोज हाश्मी ८-०-२३-१). सामनावीर – विराज यादव.