Voice of Eastern

 

मुंबई
दिवाळी हा रोषणाईचा उत्सव आणि हा उत्सव साजरा करण्यासाठी ग्राहकांची बाजारपेठांमध्ये पणत्या खरेदी करण्याची लगबग सुरू होते. विक्रोळीच्या नॅशनल असोसिएशन ऑफ डिसेबल एंटरप्राइजेस या संस्थेमध्ये काही हात हे सध्या याच आकर्षक पणत्या बनविण्यासाठी काम करत आहेत. या संस्थेच्या माध्यमातून गतिमंद आणि दिव्यांगाना पण त्या बनविण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराचं साधन दिलं जात आहे .

गेल्या दीड वर्षांमध्ये कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी बनविलेल्या पणत्या विकल्या न गेल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले होते परंतु या वर्षी मात्र या पण त्यांची ऑनलाइन विक्री संस्थेच्या माध्यमातून केली जात आहे आणि त्याला प्रतिसाद देखील मिळत आहे त्यामुळे यंदाची दिवाळी या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सुबत्ता देणारी ठरणार आहे . आकर्षक आणि सुंदर नक्षीकाम केलेल्या 35 प्रकारच्या पणत्या या विद्यार्थ्यांकडून बनवण्यात आलेल्या आहेत अनेक नामांकित कंपन्या देखील स्वतः संस्थेच्या कार्यशाळेत घेऊन या पणत्या विकत घेऊन दिव्यांगांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध करून देत आहे .

जवळ जवळ 7 लाखांहून अधिक पणत्या रंगरंगोटीसह त्याची पॅकिंग पूर्ण झाली आहे. ऑगस्ट महिन्यापासून या पणत्या बनवल्या जात आहे. या पणत्याची विक्री ओनलाईन द्वारे केली जाते. दिव्यांगाना स्वतंत्र रोजगार करता यावा , त्यांनी स्वावलंबी बनाव व आपली कला अवगत ठेवावी या दृष्टीने नेडा ( नॅशनल असोसीएशन ऑफ डिसेंबल्ड ) या संस्थेतून वर्षभर विविध कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रशिक्षण दिले जाते. दरवर्षी आम्ही विविध कालाकुसरीच्या वस्तू बनवून त्या विक्री करतो. लॉकडाऊन आधी आम्ही या वस्तू सिद्धिविनायक मंदिर , महालक्ष्मी मंदिर , हिरानंदानी सारख्या ठिकाणी आम्ही विक्री करायचो. सध्या ऑनलाईन पद्धत सुरू केली आहे. या मातीच्या पणत्या असून त्या रंगरंगोटी व पॅकिंग करण्याचे काम येथे होते. पावसाळ्यात आम्ही छत्र्या बनवतो तसेच सेफ्टी पिन तर दिवाळीत पणत्या अशी विविध काम केले जाते असे या संस्थेच्या पदाधिकारी विक्रम मोरे यांनी सांगितले.

Related posts

काश्मीर फाइल्सचे मोफत प्रदर्शनाला दादरमधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Voice of Eastern

साथरोगाच्या नियंत्रणासाठी उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

अंकिता राऊत आणि तन्मय पटेकरचे रोमँटिक कोळी गाणे ‘हुकमाची राणी’ प्रेक्षकांच्या भेटीला!

Voice of Eastern

Leave a Comment