Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय संस्थेच्या नायगाव शाखेतील मतदार यादी मृतकाची नावे, अनिल गलगलींचा आरोप

banner
  1. मुंबई

मराठी ग्रंथ संग्रहालय संस्थेच्या नायगाव शाखेतील मतदार यादी चक्क मृतकाची नावे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय  संस्थेच्या नायगाव शाखेतील सदोष मतदार यादी आणि त्यात मृतकाचे नावाबद्दल चौकशी करणे आणि योग्य ती कारवाई करण्याबाबत आरटीआय कार्यकर्ते आणि आजीव सभासद अनिल गलगली यांनी धर्मादाय आयुक्तांकडे मागणी केली आहे.

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय या संस्थेची नुकतीच पंचवार्षिक निवडणूक दिनांक 26/09/2021 रोजी संपन्न झाली. नायगाव शाखेत अनिल गलगली यांनी मतदान केल्यानंतर जेव्हा यादी तपासली असता त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. यात स्वर्गवासी झालेल्या मतदारात रोझा देशपांडे, एकनाथ साटम, बी आर सामंत, मनोज चमणकर, त्र्यंबक टोपे, सुनील जोशी, अनिल घोसाळकर, चारुशीला नाईक आणि धनंजय बरदाडे यांची नावे आहेत. तसेच कित्येक मतदार यांचा अधिकृत पत्ता आढळून येत नाही. त्यामुळं जी निवडणूक झाली ती सदोष होती आणि अश्या निवडणुका रद्दबातल करणे योग्य ठरेल, असे मत अनिल गलगली यांनी व्यक्त केले आहे.एकंदरीत सर्व शाखेतील मतदार यादी अद्ययावत करण्याची गरज आहे.

अनिल गलगली यांनी धर्मादाय आयुक्त सहित संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, निवडणूक अधिकारी किरण सोनावणे आणि निवडणुकीत बंदोबस्त देणाऱ्या भोईवाडा पोलिसांना लेखी तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे.

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची पंचवार्षिक निवडणूक
२०२१-२०२६ काही दिवसापूर्वी कोरोनाचे सर्व निर्बंध पाळून घेण्यात आली होती. ही निवडणूक सर्वच ठिकाणी अतिशय चुरशीची आणि अटीतटीची झाली. सर्व निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली, या निवडणुकीचा निकाल ८ ऑक्टोबर २०२१ रोजी लागणार आहे. मात्र अनिल गलगली यांनी केलेल्या तक्रारीनंतर धर्मदाय आयुक्त काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

Related posts

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन

Voice of Eastern

कोकण, मध्य महाराष्ट्रात २५ जूनपर्यंत मुसळधार कोसळण्याची शक्यता

मुंबई, पुणे, पालघर, रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन – पर्यटन मंत्री गिरीश महाजन

Leave a Comment