Voice of Eastern

मुंबई :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सूचनेनुसार आजपासून देशातील डॉक्टर हेल्थ वर्कर आणि ज्येष्ठ नागरिकांना यांना बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली. बूस्टर डोस घेण्यासाठी जर तुम्ही लसीकरण केंद्रांवर गर्दी करणार असाल तर थांबा, कारण लसीचा दुसरा डोस आणि बुस्टर डोस यामध्ये किमान नऊ महिन्याचे अंतर असणे आवश्यक आहे. नऊ महिने पूर्ण झाल्यावरच तुम्हाला बूस्टर डोस घेता येणार आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि नवनवे येत असलेले कोरोनाचे विषाणू यामुळे देशातील सर्व नागरिकांना बूस्टर डोस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये रुग्णालयांमध्ये सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक जण बूस्टर डोस घेण्यासाठी धाव घेण्याची शक्यता आहे. बूस्टर डोससाठी जर तुम्ही लसीकरण केंद्रांवर गर्दी करणार असाल तर थांबा, कारण तुम्हाला दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झालेले असणे आवश्यक आहेत. कोरोना लसीचा दुसरा डोस आणि बुस्टर डोस यामध्ये नऊ महिन्याचे अंतर असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला बूस्टर डोस मिळेल, अशी माहिती टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर राहुल पंडित यांनी दिली आहे. तसेच दुसरा डोस घेऊन तुम्हाला नऊ महिने पूर्ण झाले असतील आणि त्यानंतर तुम्हाला कोरोनाची लागण झाली असेल तर तुम्हाला बूस्टर डोससाठी आणखीन किमान तीन महिने वाट पाहावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे तुम्ही दुसरा डोस कधी घेतला याची तारीख पाहुनच लसीकरण केंद्रांवर बूस्टर डोस घेण्यासाठी जा, असेही त्यांनी सांगितले.

Related posts

पहिल्याच दिवशी मुलुंडच्या कोकण महोत्सवाला भरघोस प्रतिसाद

८ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे – काजल कुमारी विजेते

कोरोनाचा सामना करण्यासाठी परिचारिकांची संख्या अपुरी

Voice of Eastern

Leave a Comment