घाटकोपर :
घाटकोपर पश्चिमेकडे असल्फा येथे सकाळी १०.३० च्या सुमारास एका कापडाच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
#WATCH | Fire breaks out a godown in Ghatkopar area of Mumbai; eight fire engines rushed to the spot pic.twitter.com/tij8fX23sZ
— ANI (@ANI) January 3, 2022
घाटकोपरमधील असल्फा सुंदर बाग परिसरातील डिसिल्व्हा कंपाउंडमधील एका कापडाच्या गोदामाला सकाळी अचानक आग लागली. गोदामात कापड असल्याने आगीने क्षणात भीषण रूप धारण केले. त्यामुळे आगीमुळे धुराचे प्रचंड लोळ बाहेत पडू लागले. धुराचे लोळ पाहताच परिसरात एकच हल्लकलोळ उडाला. धुराचे लोळ पाहून स्थानिकांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या ८ गाड्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या शर्थीने आग विझवत तिच्यावर नियंत्रण मिळवले. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.