Voice of Eastern

मुंबई :

मुंबईच्या पश्चिम उपनगरात काही संस्थानी शासनाची परवानगी न घेता अनधिकृत शाळा सुरु केल्या आहेत. वांद्रे ते दहिसरदरम्यान सहा अनधिकृत शाळा शिक्षण विभागास आढळून आल्या आहेत. यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या पाच तर हिंदी माध्यमाची एक शाळा आहे. अशा अनधिकृत शाळेत पालकांनी आपल्या पाल्यांना प्रवेश देऊ नये, असे आवाहन बृहन्मुंबई पश्चिम विभागाचे शिक्षक निरीक्षक नवनाथ वणवे यांनी केले आहे.

वांद्रे ते दहिसरमध्ये इंग्रजी माध्यमाची अंधेरीपूर्वेकडील दि प्रागतिक एज्युकेशन सोसायटीचे मरोळ प्रागतिक हायस्कुल, जोगेश्वरीतील यंग इंडियन स्कूल, गोरेगावमधील इत्तेमाद इंग्लिश हायस्कूल, जे के पब्लिक स्कूल, बोरिवलीतील हिंदी माध्यमाची सरस्वती विद्यामंदिर हायस्कूल आणि कांदिवलीतील सेंट मारिया इंग्लिश स्कूल या सहा शाळा अनधिकृत असल्याचे शिक्षण विभागास आढळून आले आहे. या सर्व शाळा एसएससी मंडळाच्या ५ ते १० वीचे वर्ग असलेल्या आहेत. त्यामुळे अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांना प्रवेश देऊ नये. अन्यथा शैक्षणिक नुकसानीस ते स्वत: जबाबदार असतील, असेही शिक्षण निरीक्षक वणवे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

Related posts

गोळवलकर, सावरकरांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल पुस्तकात केलेले वक्तव्य भाजपला मान्य आहे का? – महेश तपासे

कतरिना कैफच्या इन्स्टाग्राम स्टोरी मागे काय दडलंय?

Voice of Eastern

२४, २५ मार्चला विक्रोळीमध्ये पाणीपुरवठा बंद

Voice of Eastern

Leave a Comment