Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

या दिवशी मुंबईमध्ये होणार पाणी कपात; काय आहे कारण जाणून घ्या.

banner

मुंबई : 

भांडुप संकुल येथे उदंचन केंद्रात २६ ऑक्टोबरला दुरुस्ती आणि पाणी गळती रोखण्यासाठी दुरुस्तीचे काम पालिका जल अभियंता खात्यामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे २६ ऑक्टोबरला संपूर्ण मुंबईत सकाळी १० ते रात्री १० दरम्यान १५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. तर, भांडुप, अंधेरी/ पूर्व, खार व धारावी या चार विभागात २६ ऑक्टोबरला सकाळी १० वाजल्यापासून २७ ऑक्टोबरपर्यंत सकाळी १० पर्यंत २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेतर्फे शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या भांडुप संकुल येथील १९१० दशलक्ष उदंचन केंद्रात दोन १२०० मिलीमीटर व्यासाच्या स्लुईस झडपा बदलण्याचे काम तसेच पिसे-पांजरापूर संकुलातील तृतीय टप्प्याच्या उदंचन केंद्रातील नादुरुस्त उदंचन संच काढून त्या ठिकाणी राखीव उदंचन संच बसविण्याचे काम २६ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.

पवई येथे १८०० मिलीमीटर व्यासाच्या तानसा पूर्व व तानसा पश्चिम जलवाहिनीवरील गळती रोखण्याचे कामही २६ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजेपासून २७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० पर्यंत हाती घेण्यात येणार आहे. यामुळे, संपूर्ण मुंबईत सकाळी १० ते रात्री १० या कालावधीत १५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. तर, भांडुप, अंधेरी/ पूर्व, खार व धारावी या चार विभागात २६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० पासून ते २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० पर्यंत २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणीसाठा करून ठेवावा आणि पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

या विभागात २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

  • भांडुप विभाग : फिल्टरपाडा एस एक्स – ०६ – (२४ तास)- जयभिम नगर, बेस्ट नगर, आरे मार्ग आणि परिसर, फिल्टरपाडा
  • के/पूर्व विभाग : मरोळ बस बार क्षेत्र, केई ०१ – (दुपारी २ ते सायंकाळी ५.३० वाजता)- चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी क्रमांक १ व हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगतसिंग वसाहत (भाग), चरत सिंग वसाहत (भाग), मुकुंद रुग्णालय, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, इंदिरा नगर, मापखान नगर, टाकपाडा, नवपाडा, विमानतळ मार्ग क्षेत्र, चिमटपाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक क्षेत्र, रामकृष्ण मंदीर मार्ग, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, कांती नगर
  • के/पूर्व विभाग : सहार रोड क्षेत्र, केई ०१ – (दुपारी २ ते सायंकाळी ५.३० वाजता)- कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍण्ड टी वसाहत
  • के/पूर्व विभाग : ओम नगर क्षेत्र, केई ०२ – (पहाटे ४ ते सकाळी ८ वाजता)- ओम नगर, कांती नगर, राजस्थान सोसायटी, साईनगर (तांत्रिक क्षेत्र), सहार गाव, सुतार पाखडी (पाईपलाईन क्षेत्र)
  • के/पूर्व विभाग : एम. आय. डी. सी. व भवानी नगर केई १० – (सकाळी ११ ते दुपारी २ वाजता) – मुलगाव डोंगरी, सुभाष नगर, एम. आय. डी. सी. मार्ग क्रमांक १ ते २३, भंगारवाडी, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडीविटा, महेश्वरी नगर, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गा पाडा, मामा गॅरेज
  • के/पूर्व विभाग : विजय नगर मरोळ क्षेत्र, केई – १०ए – (सायंकाळी ६ ते रात्री १०.०० वाजता) – विजय नगर मरोळ, मिलीट्री मार्ग, वसंत ओआसिस, गांवदेवी, मरोळ गांव, चर्च रोड, हिल व्ह्यू सोसायटी, कदमवाडी, भंडारवाडा, उत्तम ढाबा
  • के/पूर्व विभाग : सिप्झ आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ (२४ तास)
  • एच/पूर्व विभाग : वांद्रे टर्मिनल पुरवठा क्षेत्र
  • जी / उत्तर विभाग : धारावी सायंकाळचे पाणीपुरवठा क्षेत्र – (दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत) धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदीर मार्ग, ए. के. जी. नगर, दिलीप कदम मार्ग, कुंभारवाडा, संत गोराकुंभार मार्ग
  • जी / उत्तर विभाग : धारावी सकाळचे पाणीपुरवठा क्षेत्र – (पहाटे ४ ते दुपारी १२ वाजेपर्यंत) – प्रेम नगर, नाईक नगर, जास्मिन मील मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प, ९० फीट रोड, एम. जी. मार्ग, धारावी लूप मार्ग, संत रोहिदास मार्ग

Related posts

सैन्य दलाच्या जवानांप्रमाणे पोलीसांबद्दल जनमानसात आदराची भावना – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Voice of Eastern

बजाज हॉल अँड आर्ट गॅलरीमध्ये श्वेता बच्चन यांच्या हस्ते ‘कलियुग ३.०’ प्रदर्शनाचे उदघाटन

विधीमंडळ सभागृहाच्या नियम, प्रथा-परंपरांचे पालन योग्य प्रकारे होत नाही – अजित पवार

Leave a Comment