Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

गोवंडी, मानखुर्द, चेंबूरमध्ये १८ तास पाणीपुरवठा बंद

banner

मुंबई :

बृहन्मुंबई महापालिका जल अभियंता खात्यामार्फत ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयातील इनलेट्स व्हॉल्व्ह बदलण्याचे काम २७ जानेवारीला सकाळी १० वाजता हाती घेण्यात येणार आहे. हे काम दुसर्‍या दिवशी २८ जानेवारी पहाटे ४ वाजेपर्यंत चालणार आहे. त्यामुळे गोवंडी, मानखुर्द, चेंबूर आणि देवनार या भागातील पाणीपुरवठा १८ तास बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जाऊ लागू नये यासाठी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा व त्याचा जपून वापर करावा, असे आवाहन मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

या भागातील पाणीपुरवठा असेल बंद

देवनार, गोवंडी, मानखुर्द परिसर

मुंबई महापालिकेच्या एम/पूर्व विभागातील टाटानगर, गोवंडी स्थानक मार्ग, देवनार महानगरपालिका वसाहत, लल्लूभाई कंपाऊंड, हिरानंदानी इमारत, जॉन्सन जेकब मार्ग (ए, बी, आय, एफ सेक्टर), एसपीपीएल इमारती, म्हाडा इमारती, महाराष्ट्र नगर, देवनार गाव रस्ता, गोवंडी गाव, व्ही. एन. पूरव मार्ग, बीकेएसडी मार्ग, दूरसंचार कारखाना परिसर, मंडाला गांव, मानखुर्द नौदल, संरक्षण क्षेत्र, मानखुर्द गाव, गोवंडी स्थानक मार्ग, टि.आय.एफ.आर. वसाहत, सी, डी, ई, जी, एच, जे, के या सेक्टरमध्ये, कोळीवाडा ट्रॉम्बे, कस्टम मार्ग, दत्त नगर, बालाजी मंदीर मार्ग, पायलीपाडा, चिता कॅम्प ट्रॉम्बे, देवनार फार्म मार्ग, बोरबादेवी नगर, बीएआरसी फॅक्टरी, बीएआरसी वसाहत आदी भागात १८ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

चेंबूरमधील या भागात पाणी बंद

साईबाबा नगर, श्रमजीवी नगर, सुभाष नगर, चेंबूर गावठाण, स्वस्तीक पार्क, सिद्धार्थ वसाहत, सुमन नगर, घाटला अमर नगर, मोती बाग खारदेव नगर, वैभव नगर, मैत्री पार्क, अतूर पार्क, चेंबूर कॅम्प, युनियन पार्क लाल वाडी, लाल डोंगर

Related posts

रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारले जाईल : केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर

विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ निर्माण करण्यासाठी साजरा होणार प्रवेशोत्सव

प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी

Voice of Eastern

Leave a Comment